नाशिक: अयोध्येत (Ayodhya) एक राजकीय इव्हेंट आहे. त्यामध्ये भाजपचा (BJP) हात कुणीच धरु शकत नाही. भाजपने 2024 च्या निवडणुकीची तयारी केली आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)  भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra)  भाजप (BJP)  सरकारच्या गुंडांनी हल्ला केल्याची टीका देखील राऊतांनी यावेळी केली आहे.  ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झालाय. भाजप कार्यकर्त्यांकडून यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि राहुल गांधींची बस अडवत भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचे जोरदार नारेही दिले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी याच्याशी सकाळी बोलणे झाले. काल आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप सरकारच्या गुंडांनी हल्ला केला.  त्याचा आम्ही निषेध करतो. 

देशातील वातावरण बदलण्यासाठी उद्याचे अधिवेशन : संजय राऊत

 संजय राऊत म्हणाले,  देशातील वातावरण बदलण्यासाठी सुरवात करण्यासाठी उद्या अधिवेशन घेत आहोत. जेवढे महत्त्व अयोध्येला  आहे तेवढेच नाशिकच्या पंचवटीला आहे. अयोध्येत  श्री राम राजा तर येथे त्यांना त्याग, संघर्ष करावा लागला म्हणून आम्ही संघर्ष करणाऱ्या रामच्या पंचवटीमधील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहे.

Continues below advertisement

इव्हेंट करण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही : संजय राऊत

अयोध्येत अभूतपूर्व सोहळा आहे, त्याला  पण भाजपने खाजगी स्वरूप दिले आहे.  मुख्य चार पिठाचे शंकराचार्य यांनी विरोध केला आहे. हा पॉलिटिकल इव्हेंट आहे. रामाचा उत्सव राष्ट्रीय धार्मिक उत्सव व्हायला हवा होता. इव्हेंट करण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले. 

अयोध्येत श्री राम मंदिरात  प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु आहे. नाशिकला शिवसेना काळाराम मंदिरात रामाची पुजाअर्चा करेल. उद्या पक्षाचे अधिवेशन होणार आहे. 2 हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.   आज 12.30 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचे आगमन होईल. भगुर येथे सावरकरांच्या स्मारकाला अभिवादन करतील, असेही संजय राऊत म्हणाले. 

हे ही वाचा:

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : खोटं बोलण्यासाठीच संजय राऊतांनी पृथ्वी तलावावर जन्म घेतला; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला