Ajit Pawar : पोलीस दलात समता, बंधुता, सन्मान राखला पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला पाहिजे. आपल्या कामगिरीने पोलीस दलाचा गौरव कसा वाढविता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी अजित पवार बोलत होते. प्रत्येकवेळी कायद्याचा बांबू आडवा टाकलाच पाहिजे असे नाही, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.


322 पोलीस उपनिरीक्षक आजपासून पोलीस सेवेत दाखल होत आहेत. तुम्ही वेगवेगळ्या शाखेचे पदवीधर असाल. पण तुम्ही सर्वजण उच्चशिक्षीत आहात. त्यामुळे तुमच्या ज्ञानाचा, कौशल्याचा जास्तीत जास्त फायदा पोलीस दलाला, राज्याला, नागिराकांना करुन दिला पाहिजे असे अजित पवार म्हणाले. दहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत संघ भावना वाढीस लागली ती संघ भावना कायम ठेवा. अनेक विद्यार्थी MPSC चा अभ्यास करतात. मात्र, सर्वांना यश मिळतेच असे नाही. उत्तम अधिकारी म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण करा असेही अजित पवार म्हणाले. सन्मानाने कार्यकाळ पूर्ण करा. पोलीस दलाकडून होणारी शिपाई भरती तसेच MPSC कडून होणारी प्रक्रिया पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त असल्याचे अजित पवार म्हणाले. अनेक प्रश्न कायद्यानेच सुटतात असे नाही. माणुसकीच्या समजुदारपणाच्या भावनेतून देखील सोडवता येतात. प्रश्न अडवण्यापेक्षा सोडवण्यावर आपण भर दिला पाहिजे असे ते म्हणाले.


प्रत्येकाचा फायदा पोलीस दलाला झाला पाहिजे. राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात काम कराल, भ्रष्टाचारमुक्त काम कराल, पोलीस दलाचा लौकिक टिकवाल, सामर्थ्य वाढवाल असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला. राज्यघटनेशी बांधिलकी असली पाहिजे. जातपात धर्म यासाठी बांधिलकी नसावी. वैयक्तिक आकस दाराच्या आता ठेवा असेही ते म्हणाले. आपले बोलणे, वागणे, विचार करणे सर्व  व्यवस्थित असेल पाहिजे कारण, आपल्या वर्तणुकीवर माध्यमांचे लक्ष राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले.


अंगावर पोलिसांची वर्दी घालण्याचे अनेकांचे स्वप्न असते. काही जणांचे पूर्ण होते, मात्र, काही जणांचे पूर्ण होत नाही. प्रामाणिकपणे काम पार पाडाल, सन्मानपूर्वक सेवा पूर्ण कराल असेही अजित पवार म्हणाले. आपण सरकारचे एक भाग आहोत.पद कोणतेही असले तरी पोलीस दलात एकमेकाबद्दलची आदराची भावना जपली पाहिजे. वरिष्ठांना कनिष्ठांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आपल्या कामगिरीने पदाचा लौकिक कसा वाढवता येईल याचा विचार करा असे अजित पवार म्हणाले. कायदा पाळताना माणुसकी विसरु नका असेही अजित पवार म्हणाले.