Sushma Andhare नाशिक : काल राम मंदिर उद्घाटनाचे (Ram Mandir Inguration) पॉलिटिकल टूल किट करण्यात आले. तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का? मोदींच्या काळात दुपारी १२ वाजता देखील स्त्री निर्भयपणे रस्त्याने वावरू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नाशिकला राज्यव्यापी अधिवेशनात केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. अनेक गोष्टीसाठी नाशिक प्रसिध्द आहे. नाशिकमध्ये ललित पाटील सारख्याला पाठीशी घालणारे काही नेते फिर भी मेरी दाढी कैसी सफेद है, असे दाखवणारे काही बदमाश इथे आहे, असा टोला त्यांनी दादा भुसे यांना लागवला आहे.
पुन्हा सत्तेची नांदी
उगाचच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाबी मीच छोटी भाबी, असे म्हणणारे लोक देखील या नाशिकमध्ये आहेत. पण त्याही पेक्षा नाशिकमधील काही ऐतिहासिक स्थळ भगूर सावरकरांचे जन्मस्थळ, काळाराम मंदिर, मंदिराच्या बाहेर बाळासाहेब आंबेडकरांचा शिलालेख आहे. याला उद्धव ठाकरेंनी अभिवादन केले. १९९४ साली नाशिकचे अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली होती. आता पुन्हा सत्ता येण्याची नांदी असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंचे कौतुक
या महाराष्ट्रात ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. राम एकधर्म आणि एक पत्नी होता. काल उद्धव ठाकरेंनीआरती केली पण पत्नीचे सर्व सन्मान दिले, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची कौतुक केले. काही नेते मात्र काल एकटेच पळत होते. एकटेच सर्व काही करत होते आणि पत्नी वनवासात होती, अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली.
आशिष शेलारांना डिवचले
आशिष कुरेशी म्हणत आशिष शेलारांना त्यांनी डिवचले. यांचे मोठे नेते आरोप करतात ७० हजार कोटींचा उल्लेख करतात आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांना पक्षात सामील करून घेतात. हे कसले एकवचनी, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
मोदींच्या काळात महिलांचा अपमान
देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही म्हणतात आणि भर दुपारी २ वेळ लव्ह मॅरेज करतात. मोदींच्या काळात रात्री १२ नाही तर दिवसा सुद्धा महिला सुरक्षित नाहीत. महिलांचा अपमान केला जातो. राष्ट्रपतींना बोलवले जात नाही. महिलाना न्याय देत नाही तरी महिला आरक्षणाचे गाजर दाखवतात. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय महिलांना आरक्षण मिळणार नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
आणखी वाचा