Nashik News update : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भुमिका नरेश राऊत आणि उज्वला नरेश राऊत अशी या मुलींची नावे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाऊबीजेच्या दिवशी नाशिकहून कोपरगावी माहेरी गेलेल्या विवाहितेचा आणि तिच्या भाचीच्या तलावात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज सुरगाणा तालुक्यातील राशा गावी शोककळा पसरली आहे. कपडे धुवायला गावापासून काही अंतर असलेल्या तळ्यावर गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे.
सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोन सख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील उंबरठाण जवळील राशा येथील इयत्ता चौथीत शिकणारी भुमिका नरेश राऊत आणि इयत्ता दुसरीत शिकणारी उज्वला नरेश राऊत या सख्या दोघी बहिणी अकरा वाजण्याच्या सुमारास राशा देऊळपाडा येथून बर्डी येथील गावतळ्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना थोरली बहिण भुमिका हिचा पाय घसरल्याने ती बुडाली. यावेळी तिला वाचवण्यासाठी उज्वला हिने पाण्यात उडी मारली. दोघींना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघीही बुडू लागल्या. मोठ्या बहिणीला वाचविण्याचा नादात दोघींची घट्ट मिठी पडल्याने दोघींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या