नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज नाशिकच्या नांदगाव दौऱ्यावर (Nandgaon) येत असून आमदार सुहास कांदे (Suhas Kand) यांच्या प्रयत्नाने नांदगावमध्ये उभारण्यात येत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीमधील (Shivsrushti) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. नांदगावच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे.


या सोहळ्यास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध संगीतकार व गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, गायिका वैशाली सामंत यांच्या सुश्राव्य गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 


शिवसृष्टी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे 


- अडीच एकरमध्ये उभारण्यात आली आहे शिवसृष्टी.


- 20 फुटांच्या चौथऱ्यावर 31 फूट उंच असा ब्रांझ धातूतील अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा.


- तब्बल एक वर्ष हा पुतळा बनविण्यासाठी शिल्पकार यांना लागले.


- सभोवताली कारंजासह नैसर्गिक हिरवळीचे देखणे उद्यान.


- साडे पंधरा मीटर उंचीचे भव्य प्रवेशद्वार.


- म्युरल चित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या विविध कथा याठिकाणी अनुभवायला मिळणार.


- शिव चित्रपटगृह या संकल्पनेच्या माध्यमातून एक मिनी थिएटर असणार आहे.


- शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य व वे आरमारासंदर्भात प्रेरणा देणारे प्रसंग.


- उद्यान, व्यायामाची साधने, अ‍ॅम्पी थिएटर, जॉगिंग ट्रक आदी सुविधा या शिवसृष्टीत असणार आहे.


- आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव मतदारसंघातील शिवप्रेमी जनतेला हा अनोखा नजराणा मिळाला आहे. 


सुहास कांदेंच्या हस्ते अभिषेक सोहळा


दरम्यान, सप्त नद्यांसह चारी धामवरून आणलेले पवित्र जल, 51 लिटर शुद्ध दूध, पंचामृत, गुलाबजल, आणि 121 पुरोहितांनी मंत्रोचारात केलेले विधिवत पौरोहित्य, अशा वातावरणात शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुद्ध पुतळ्याचा अभिषेक सोहळा आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते काल पार पडला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज लोकार्पण होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


तानाजी सावंतांच्या वक्तव्यामुळे महायुती फुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याची सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा, नेमकं काय घडलं?


शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला तयार; राजकारण करणं हे दुर्दैव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे