Girish Mahajan on Uddhav Thackeray : आज नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) प्रचार सभांचा धुराळा सुरु आहे. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. 


तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या प्रचार सभेसाठी दाखल झाले आहेत. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडणार आहे. 


ठाकरेंना भेटणार का? काय म्हणाले गिरीश महाजन? 


यासाठी उद्धव ठाकरे नुकतेच एका हॉटेलमध्ये दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे देखील नेमके त्याच हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी गिरीश महाजनांना तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? असे विचारले असता त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. उद्धव ठाकरेंना मी कशाला भेटू? असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.


शरद पवारही नाशिक दौऱ्यावर


दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वणी गावात होणार शरद पवारांची सभा होणार आहे. शरद पवार दोन दिवस नाशिकला मुक्कामी असणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आज नाशिकमध्ये असल्याने नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका


मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे 'अग्निपथ', ते जे बोलतात तेच करतात; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं