Shantigiri Maharaj नाशिक : शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यामुळे महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. आता सहा लोकसभांच्या जागांसाठी शांतीगिरी महाराज नक्की कुणाला पाठींबा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


सहा लोकसभा मतदारसंघासाठी शांतीगिरी महाराज आज अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2024) मुहूर्तावर दुपारी तीन वाजता नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जळगाव (Jalgaon), जालना (Jalna), शिर्डी (Shirdi), धुळे (Dhule) आणि दिंडोरी (Dindori) हा सहा लोकसभेत (Lok Sabha Election 2024) शांतीगिरी महाराजांचा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा असणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


बाबाजी भक्त परिवाराचे मतदान कोणाच्या पारड्यात?


मागील काही दिवसात अनेक राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली आहे.  शांतीगिरी महाराज हे स्वतः नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढत आहेत. आजच्या पाठिंब्याच्या घोषणेनंतर शांतीगिरी महाराजांना नाशिकमध्ये कोणत्या पक्षाचा छुपा पाठिंबा मिळणार? हे जवळपास स्पष्ट होणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. बाबाजी भक्त परिवाराचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शांतीगिरी महाराज - हेमंत गोडसे प्रचारावेळी आमनेसामने 


दरम्यान, काल (दि. 09) सिन्नर येथे प्रचारावेळी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे आमनेसामने आल्याचे दिसून आले. यावेळी नाशिक का खासदार कैसा हो, शांतीगिरी महाराज जैसा हो, अशी घोषणाबाजी हेमंत गोडसेंसमोरच  शांतीगिरी महाराजांच्या भक्त परिवाराने केली. त्यानंतर गोडसे आणि शांतीगिरी महाराजांची भेट झाली. यावेळी शांतीगिरी महाराजांची निवडणुकीसाठी असलेली बादली ही निशाणी त्यांनी हेमंत गोडसेंना भेट म्हणून दिली.  यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांचे होर्डिंग्स चर्चेत


जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं' असा मजकूर शांतीगिरी महाराजांच्या होर्डिंग्सवर लिहिण्यात आला असून एकप्रकारे या माध्यमातून सूचक इशाराच महायुतीला देण्यात आला आहे. महायुतीकडून नाशिकसाठी तिकीट मिळावे अशी महाराजांची इच्छा होती. उमेदवारी अर्ज भरताना देखील त्यांनी एबी फॉर्म मिळाला नसताना शिवसेनेच्या (Shiv Sena) नावाने तो अर्ज भरल्याने महाराजच युतीचे उमेदवार असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.


आणखी वाचा 


मोठी बातमी : इम्तियाज जलील यांनी घेतली शांतीगिरी महाराजांची भेट, संदिपान भुमरेही भेटीसाठी पोहोचले; बाबाजी भक्तपरिवाराचा पाठिंबा कुणाला?