नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांनी शिवसना खासदार संजय राऊत (Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. खोटं बोलण्यासाठीच संजय राऊत यांनी पृथ्वी तलावावर जन्म घेतला. त्यामुळे ते वेगवेगळी टीका करत असतात. देवेंद्रजीं यांच्या कार सेवेवर देखील टीका केली, असे म्हणत बावनकुळे यांनी टोला लगावला. 


उद्धव ठाकरे भरकटले आहेत 


बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिर भेटीवरही तोफ डागली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सध्या भरकटले आहेत. काळाराम मंदिरात प्रतिपूजा ठेवण्यापेक्षा राजकारण बाजूला ठेवून त्यांनी अयोध्येच्या सोहळ्याचं निमंत्रण स्वीकारायला हवे होते. असंख्य भारतीय नियंत्रणाच्या प्रतीक्षेत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण न स्वीकारून चूक केली असल्याचे ते म्हणाले. 


लवकरच संपूर्ण राज्य सरकार अयोध्येला जाणार


दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट जो न रहा राम का, वो न किसी काम का! अशी टीका शेलार यांनी केली. 


ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि गटाला सवाल केला आहे. भगवान श्री काळारामसमोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल म्हणत टीका केली आहे. ते म्हणाले की, पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली. लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथयात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली. राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेची फळे चाखली, अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का? अशी विचारणा त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या