नाशिक : पावसाळ्यात दरड कोसळून 'माळीण' सारखी दुर्घटना घडू नये, यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तश्रृंगी गडासह (Saptashrungi Gad) कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) 31 धोकादायक गावांची (Dangerous Villages) यादी तयार केली असून, पावसामुळे (Rain) या गावांमध्ये भूस्खलन (Landslide) होण्याचा धोका अधिक असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) विभागाने जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी (Geological Survey) प्रस्ताव पाठवला आहे. 


कळवणमध्ये अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी असून लोकवस्ती आहेत. सप्तशृंगी गडावरही पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या धोका अधिक असतो. त्यातून रस्ता बंद होणे, वाहतूक कोंडी होते. तसेच भूस्खलन होऊन भराव पाहून येत असल्याच्या घटनांमुळे भविक व ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होत शक्यता अधिक असते.


सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव


संभाव्य धोका टाळण्यासाठी सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून 91 कोटी 20 लाखांचे तीन प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र त्यावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. 


दरड कोसळण्याचा धोका असलेली गावे 


सप्तशृंगी गड, मांगलीदार, ततानीपाडा, जामले, कोसुर्डे, भाकुर्डे, करंभेळ, देसगाव, तिन्हळ, गांडूळ मोकपाडा, आमदर, दिगमे, खर्डेदिगर, उंबरगव्हाण, चोळीचामाळ, हनुमंतमाळ, महाल, पायरपाडा, काठरे दिगर, बोरदैवत, देरेगाव, वणी, मोहनदरी, नांद्री, मेहदर, मुळाणे वणी, वडाळे, पिंपरी माकैड, कातळगाव, पाळे पिंप्री, अशा तब्बल ३१ गावांमध्ये माळीणसारखी दरड कोसळणे, पावसामुळे भू स्खलन होण्याच्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे.


संरचनात्मक स्वरूपाच्या 46 कामांसाठी 163 कोटींचा प्रस्ताव 


याशिवाय जिल्ह्यातील संरचनात्मक स्वरूपाच्या 46 कामांसाठी 163 कोटी 25 लाखांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बिगर संरचनात्मक स्वरूपाचा तीन कोटी दहा लाखांच्या चार कामांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्च व मे 2024 या कालावधीत 260 कोटी 65 लाखांची विविध स्वरूपाची कामे प्रस्तावित केली आहेत. प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य सरकार त्यांच्या तांत्रिक समितीकडे पाठतात. कामांची उपयुक्तता बघूनच त्यांना अंतिम मान्यता मिळते आणि निधी मंजूर केला जातो.


इतर महत्वाच्या बातम्या 


China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! भूस्खलन होऊन 47 ढिगाऱ्याखाली अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु


Shimla Landslide : हिमाचलमध्ये भूस्खलन! शिमल्यातील शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती