नाशिक : गोदा आरतीवरून (Goda Aarti) नाशकात रामतीर्थ सेवा समिती (Ramtirth Seva Samiti) आणि पुरोहित संघात (Purohit Sangh) पुन्हा वाद झाला आहे. रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने गोदा घाटावर होणाऱ्या बांधकामाविरोधात पुरोहित संघाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही दिसून आले.
फेरुवारीमध्ये पुरोहित संघ (Purohit Sangh) आणि रामतीर्थ समिती यांच्यात गोदावरीची आरती कोणी करावी यावरून वाद सुरू झाला होता. हा वाद मिटला नसल्याने पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी समिती दोघांनी वेगवेगळी आरती करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून रामकुंड (Ramkund) परिसरात गोदावरीच्या (Godavari River) दोन स्वतंत्र आरत्या होत आहेत. त्यातच आता रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने गोदा घाटावर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विरोधात पुरोहित संघ चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
पुरोहित संघाकडून ठिय्या आंदोलन
पुरोहित संघाकडून गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलीस (Police) आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाली. सध्या रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने दररोज शासकीय गोदावरी आरती सुरु आहे. याच आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला पुरोहित संघाने कडाडून विरोध केला आहे.
पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण
बांधकामाला विरोध दर्शवत पुरोहित संघाने हे बांधकाम करू नये, बांधकाम करायचं असेल तर आमच्या डोक्यात येथे दगड घालून आम्हाला या ठिकाणी बळी द्या, आम्ही हुतात्मा स्वीकारायला तयार आहोत, अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या रामकुंड येथे पंचवटी पोलीस दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गोदा आरतीसाठी 11 कोटींचा निधी
दरम्यान, वाराणसी, हृषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीप्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखील कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मांडली होती. या 'गोदा आरती' उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून 11 कोटी 77 लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला आहे.
आणखी वाचा