PM Narendra Modi नाशिक : यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) नाशिकला (Nashik) बहुमान मिळाला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे. महोत्सवाचे बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले. 


शुभंकर चिन्ह म्हणून महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ची निवड करण्यात आली आहे. अयोध्येत (Ayodhya) राम मंदिराचे उद्घाटन होत असताना रामभूमी नाशिकमध्ये हा महोत्सव होत आहे. अयोध्येत सुरू असलेल्या जय्यत तयारीचा प्रभाव या महोत्सवात दिसणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी म्हटले आहे.


नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो (PM Narendra Modi road show in Nashik)


नाशिकच्या तपोवन येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यावर हेलिपॅडपासून ते कार्यक्रमळापर्यंत ते असा रोड शो करणार आहेत. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होतील. न भूतो,न भविष्यती असा हा कार्यक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या रोड शोचा मार्ग नेमका कसा असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. कार्यक्रमस्थळालगत हेलिपॅड उभारून रोड शोचे आयोजन करण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे. 


8 हजार युवकांचा महोत्सवात सहभाग


स्वामी विवेकानंद यांच्या जन्म दिवसानिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा मान नाशिकला मिळाला आहे. देशातील 8 हजार युवक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. ही नाशिककरांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 


पालकमंत्र्यांकडून उद्घाटन स्थळाचा आढावा


या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी तपोवनातील मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त संदीप, जिल्हाधिकारी आणि ईतर सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. हेलिपॅड, सभा मंडप, पार्किंग याबाबत त्यांनी आढावा घेतला.


इतर महत्वाच्या बातम्या


ABP Majha Exclusive : अयोध्या विमानतळावर नाशिकच्या कलावंतांचा कलाविष्कार; 305 फुटांच्या कॅनव्हास पेंटिंगची देशभरात चर्चा


Nashik News : नाशकात थंडीची चाहूल, चांदीच्या गणपतीला घातलं स्वेटर अन् शॉल; बाप्पाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी