National Youth Festival नाशिक : यंदा 27 राष्ट्रीय युवा महोत्सवाची (National Youth Festival) संधी नाशिकला (Nashik News) मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र उद्घाटन (Inauguration) झाल्यानंतर मात्र महोत्सवाच्या कार्यक्रमांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 


महोत्सवाच्या आयोजनात सहभागी असलेल्या केंद्र सरकार, राज्य शासन आणि खासगी संस्था यांच्या असमन्वयाचा महोत्सवासाठी हजारो किलोमीटरवरून आलेल्या युवा वर्गाला फटका बसत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी सतर्क असलेले प्रशासन पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मात्र जणू काही गायब झाल्याचे चित्र आहे. तसेच समारोपाच्या कार्यक्रमाला कोण प्रमुख पाहुणे असणार? याबाबत अद्याप निश्चिती नसल्याचे आयोजकांनी सांगितल्याने आता समारोपाला नक्की कोण उपस्थित राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन


स्वामी विवेकानंदांचा १२ जानेवारी हा  जन्मदिवस असल्याने या निमित्त ‘राष्ट्रीय युवा दिनाचे’ आयोजन केले जाते. या दिवसापासून सुरू होणारा आठवडा 'राष्ट्रीय युवा सप्ताह' म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय युवा सप्ताह उत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करते. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा हा कार्यक्रम आहे. 


यंदा नाशिकला बहुमान


दरवर्षी एका राज्यामध्ये संयुक्त उपक्रम साजरे केले जातात. देशभरातील तरुणांचे मेळावे आयोजित करून आणि त्यांना विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून  राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो. यंदा हा मान नाशिकला मिळाला आहे. 


असमन्वयामुळे युवा वर्गाला फटका


राज्याचा क्रीडा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने युवा महोत्सवासाठी अतिशय कमी वेळेत तयारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार हे निश्चित झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री, पालकमंत्री, राज्याचे वरिष्ठ मंत्री यांनी जिल्ह्यात तळ ठोकून आढावा बैठका घेतल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाशिक गाठत पाहणी केली होती. उद्घाटन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला गर्दी न होणे, बाहेरच्या राज्यातील युवांना प्रवासासाठी व्यवस्थित सुविधा उपलब्ध न होणे यामुळे नियोजनात असमन्वय दिसून आला. याचा फटका युवा वर्गाला बसत असल्याचे दिसून येते.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Yeola Patangotsav 2024 : ढील दे, ढील दे दे रे भैया...! येवल्यात 'एबीपी माझा'च्या पतंगाची जोरदार चर्चा


Nashik News : मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला नाशकात दुर्दैवी घटना; तारांवर अडकलेली पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू