Nashik Rain Update : सर्वदूर पाऊस सुरु असताना नाशिक जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस सुरु असल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत नाशिककरांसह जिल्ह्यातील नागरिक आहेत. राज्यभरामध्ये मान्सून दमदार हजेरी लावली असली तरी नाशिक जिल्ह्याला मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षाच असल्याचं बघायला मिळते आहे. दमदार पाऊस नसल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये धरणांची पाण्याची पातळी देखील खालावलेली आहे.


नाशिक जिल्ह्यात (Nashik) पावसाला सुरुवात झाली असली तरी अजूनही बहुतांश तालुक्यातील रहिवाशांनी यंदा दमदार पाऊसच (Nashik Rain) अनुभवलेला नाही. एक जून ते 30 सप्टेंबर हा पावसाचा हंगाम समजला जातो. दरम्यान एक जून ते 18 जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 353.8 मिलिमीटर पाऊस होण्यापेक्षा होते. परंतु प्रत्यक्षात 223.8 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. सरासरीच्या 63.3 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात मिलीमीटरची तूट सध्या दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात सरासरीच्या केवळ 63 टक्के पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पेरण्यांसह लावणीची कामे खोळंबली आहेत. पाच तालुक्यात तर सरासरीच्या निम्म्याच पावसाची नोंद झाल्याने पेरणे ही कोळंबल्या असून सगळीकडे धुवाधार पाऊस सुरू असताना नाशिकवर मात्र पाऊस रुसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


एकीकडे मान्सूनचा (Mansoon) दमदार आगमन झालेला असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्याला मात्र (Nashik Rain) अद्यापही मुसळधार आणि दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. मान्सून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दाखल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ देखील झालेली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यामध्ये अगदी याच्या विपरीत परिस्थिती बघायला मिळते आहे. मान्सून नाशिकमध्ये म्हणायला दाखल झाला असता तरी रिमझिम पावसाव्यतिरिक्त नाशिकला यंदा पाऊस पडलेला नाही. जुलै महिना संपत आला तरी देखील नाशिकमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने धरणांची पाण्याची पातळी खालावलेलीच असल्याचं बघायला मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा देखील कमी आहे. 


नाशिक जिल्ह्यात इतका पाणीसाठा 


अगदी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) फक्त 42 टक्के पाणीसाठा सध्या आहे. कश्यपी धरणात 24 टक्के गौतमी धरणात 19 टक्के मुकणे धरण जे महत्त्वाचं मानलं जातं, तिथे 53 टक्के, आळंदी धरणात अवघा 8 टक्के पाणीसाठा आहे. तर दारणा धरणामध्ये 65 आणि पालखेडमध्ये 35 टक्के एवढा पाणीसाठा आहे. या व्यतिरिक्त करंजवणमध्ये 25 टक्के तर वाघाडमध्ये 18 टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान आगामी तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे नाशिककर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी हे सध्या आकाशाकडे नजरा लावून बसलेले आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये मुसळधार आणि चांगल्या पद्धतीचा दमदार मान्सून जर नाशिकमध्ये दाखल झाला तर निश्चितपणे नाशिककरांसह इथल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Mumbai Local News : लोकल खोळंबली, आईनं बाळ गमावलं; रेल्वे ट्रॅकवरून चालताना चार महिन्याचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं