Nashik Onion News नाशिक : येथील बाजार समितीत (Bajar Samiti) कांद्याचे दर (Onion Price) पुन्हा एकदा घसरल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. कांद्याला सरासरी 1 हजार ३१० रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. 


नोव्हेंबर २०२३ मध्ये लाल कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आवक मर्यादित राहिली होती. त्यावेळी सरासरी दर प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांपर्यंत होते. केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या निर्यातबंदीमुळे (Onion Export Ban) क्विंटलमागे दोन हजार रुपयांपर्यंत घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. 


शेतकऱ्यांचा क्विंटलमागे 600 रुपयांपर्यंत तोटा


जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला 1 हजार 800 ते 1 हजार 900 रुपयांवरून दर 1 हजार 300 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे क्विंटलमागे ६०० रुपयांपर्यंत तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांची आर्थिक अडचण वाढतच चालली आहे. 


निर्यातबंदी जाहीर झाली अन् कांदा गडगडला


दरम्यान, केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 7 डिसेंबरला देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये कांदा निम्याहून अधिक दराने कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. घाऊक बाजार 34 रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखविली होती, पण निर्यातबंदी जाहीर झाली आणि कांद्याचे दर गडगडले. 


कांदा निर्यातबंदी उठवावी


त्यानंतर कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात (Gujarat), राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कांदाही बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तरी कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.


कांदा निर्यातबंदीचा फटका विवाह सोहळ्यांना


केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) मुलांचे एक हजाराहून अधिक विवाह (Marriage) होऊ शकले नाहीत. विवाह पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांदा निर्यातबंदी उठविल्यास रखडलेले विवाह होतील. बँकांचे (Bank) कर्ज फेडणे, शेतीसाठी घेतलेले कर्ज, तसेच दैनंदिन आर्थिक व्यवहारदेखील सुरळीत होण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 


आणखी वाचा


Nashik Weather Update : नाशिक, धुळ्यात हुडहुडी! निफाडला निचांकी तापमान; द्राक्ष बागायतदार चिंतेत


Nashik ATS : नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी एकजण अटकेत