Nashik Onion News : सध्या कांद्याच्या (Onion) दरात घसरण झाली आहे. त्यामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) अडचणीत सापडला आहे. कांद्याचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका शेतकऱ्यानं 20 कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मुद्रा रेखाटली आहे. तर एका कांद्यावर दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी (Sharad joshi) यांचंही चित्र रेखाटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसाठी पुरेसं काम करत नाहीत, त्यांचं शेतकऱ्यांकडं लक्ष वेधण्यासाठी  मेहनत घेऊन एका शेतकऱ्याने कांद्यावर बारीक कलाकुसर केली आहे.


रात्रीचा दिवस करुन पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं कलाकार शेतकऱ्यानं 20 कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या मुद्रा रेखाटल्या आहेत. तर एका कांद्यावर दिवंगत शरद जोशी यांची मुद्रा रेखाटली आहे. किरण दादाजी मोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते एक व्यंगचित्रकार आहेत. 


शेतकरी किरण मोरे यांना नेमकं काय सांगायचयं?


आज बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नाही. त्यामुळं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी शरद जोशी यांच्या जयंतीदिवशी देखील कांद्यावर त्यांची मुद्रा काढली होती. सध्या कांद्याला कोंब फुटले आहेत. मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही. म्हणून मी कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुद्रा काढल्याची माहिती किरण मोरे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचं प्रेम आहे. मात्र, त्यांनी गरीब शेतकऱ्यांकडं लक्ष द्याव. शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी ही कलाकृती केल्याचे मोरे म्हणाले. मला एक चित्र काढण्यासाठी अर्धा दिवस लागल्याचे मोरेंनी सांगितले. आज कांदा टिकला आहे पण भाव टिकाला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यानं जगायचं कसं? असा प्रश्न निर्माण झाल्याचे मोरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांची कांद्यावर चित्र रेखाटताना ब्रशचा वापर केला असल्याचे मोरे म्हणाले.


आंदोलन करुनही शेतकऱ्यांना काही मिळत नाही


सरकार कोणतही सत्तेवर असू द्या, त्या सरकारला शेतकरी विरोधी धोरणं राबवण्यात जास्त आनंद वाटत असल्याचे मत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शेतकरी कायम संकटात असला पाहिजे, त्याला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळू नये ही सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करुनही काही मिळत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार होणं आवश्यक आहे. विद्यापीठे असतील, संस्था असतील या शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : शरद पवार कृषीमंत्री असताना एका कॉलवर कांदा निर्यात खुली व्हायची, आता आपल्याला कोणी वाली नाही : अजित पवार