नाशिक : सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे (Samruddhi  Highway)  काम प्रगतीपथावर पथावर सुरु आहे. मात्र सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गाचा ब्रिज काम सुरू असताना अचानक ब्रिज कोसळला (Samruddhi  Highway  Bridge Collapsed) आहे. सुदैवाने सायंकाळच्या सुमारास काम बंद असल्याने जीवितहानी टळली आहे. 


समृद्धी महामार्ग उद्घाटनापासूनच या ना त्या कारणाने चर्चेत आला आहे. उद्घाटन झाल्यानंतर 120 च्या गतीने वाहने धावत आहेत. मात्र अपघातांच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अशातच इगतपुरी परिसरात बेळगाव तऱ्हाळे गावानजीक ब्रिजचं काम सुरू आहे. मात्र प्रगती पथावर असलेला ब्रिज अचानक कोसळल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेला ब्रिज कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून समृद्धी महामार्गावरून जाणारा बेलगाव तऱ्हाळे आणि गांगडवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू होते. ज्या ठिकाणी काम सुरू होते, तो समृद्धीचे काम सुरू असलेला रस्ता असल्याने तेथे वर्दळ नव्हती. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुलाच्या चार लेनचे पिलर एका उभ्या असलेल्या पिलरवरून दुसऱ्या पिलरवर बसविण्याच्या प्रयत्नात खाली आले. या पुलाचा जवळपास 200 ते 250 मीटरचा भाग अचानकपणे समृद्धी महामार्गावर कोसळला. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही समाधानाची बाब  आहे.  समृद्धी महामार्गाचे काम कसेतरी उरकले जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.


ढिगारा उचलण्याचे काम सुरू


नागपूर ते शिर्डीपर्यंत या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन हा महामार्ग सुरु सुद्धा झाला आहे. सिन्नर पासून मुंबईपर्यंत काही ठीकाणी या महामार्गाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. दरम्यान पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर पुलाचे काम करीत असलेल्या जीव्हीपीआर कंपनीला समजतात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संबंधित कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचा ढिगारा उचलण्यासाठी आधुनिक यंत्रणा बोलावली. येथे पाच ते सहा जेसीबी, फॉकलँड, गॅस कटर आदीच्या साहाय्याने सुमारे 100 कामगार युद्ध पातळीवर ढिगारा उपसण्याचे काम करत होते.


हे ही वाचा :


Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे काय? संशोधन अभ्यासाचा चिंता वाढवणारा निष्कर्ष