उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नाशिक ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मंगळवार 27 फेब्रुवारी, 2024 रोजी मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी दिली आहे.
वडाळा गावात स्थानिक टवाळखोरांनी पुन्हा एकदा नागरिकांना वेठीस धरुन त्यांच्या जीवास धोका निर्माण केल्याची घटना घडली. हातात लाठ्याकाठ्या घेऊन या टवाळखोरांनी नागरिकांच्या घरांवर दगडफेक करुन एकमेकांना चोपून धुमाकूळ घालण्यात आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघावर याआधी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच आहे, असा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्या लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नाशिक : शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली २१ फेब्रुवारीपासून चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, दिंडोरीसह इतर तालुक्यांतून हजारोंच्या संख्येने लाल वादळ निघाले आहे. हे लाल वादळ सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
शरद पवार हे रायगडावर गेले हे कौतुकास्पद : छगन भुजबळ
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात आले. यासाठी शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर रायगडावर गेले होते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून शरद पवार हे रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुकीत तुतारी किती वाजेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात थंडी कमी झाल्याचे चित्र होते. यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा नाशिक जिल्ह्यात अचानक तापमानात घट झाली आहे. दोन दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत. नाशिकमध्ये रविवारी 10.2 किमान अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर शनिवारी किमान 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांनी कपाटात ठेऊन दिलेले उबदार कपडे पुन्हा एकदा परिधान करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
पार्श्वभूमी
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक ताज्या बातम्या मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...