North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील बातम्या वाचा एका क्लिकवर

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, ताजे अपडेट्स, सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

अनिरुद्ध जोशी Last Updated: 28 Jan 2024 07:11 PM
Maratha Reservation : परीक्षा केंद्राजवळच डीजे लावून जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी मुख्य परीक्षा होती. जिल्हा न्यायालयासमोरील बिटको हायस्कूल हे परीक्षा केंद्र होते. याठिकाणी असलेल्या शिवतिर्थावर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने जल्लोषकर्त्यांनी डीजे लावून घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना परीक्षा सुरू असल्याचे सांगूनही त्याठिकाणी असलेल्या वक्ता व त्याचे पदाधिकारी पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून आले. 

Nashik Leopard : इगतपुरीत बिबट्याचा विद्यार्थ्यांवर हल्ला, विद्यार्थ्याने वाचवले तीन मित्रांचे प्राण

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) धार्णोली येथे बिबट्याने (Leopard) विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यावेळी एका दहावीतील विद्यार्थ्याने आपल्या तीन मित्रांचे प्राण वाचवले आहे. 


सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

Nashik Crime : घोटीतील खुनाचा 12 तासांत छडा

घोटी येथील पचितराय बाबा नगरासमोर दोन दिवसांपूर्वी दगडाने ठेचून झालेल्या एका तरुणाच्या खूनाचा घोटी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईमुळे अवघ्या बारा तासांत छडा लागला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Nashik MVP Marathon : नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये उत्तर प्रदेशचा अक्षय कुमार विजयी

8 व्या राष्ट्रीय व 13 व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा थरार रविवारी रंगला. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले मीर रंजन नेगी यांची या मॅरेथॉनला प्रमुख उपस्थिती होती. ४२ किलोमीटर अंतराच्‍या पूर्ण मॅरेथान स्‍पर्धेत उत्तर प्रदेशचा अक्षय कुमार विजेता ठरला आहे. 


सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

छगन भुजबळांचा राज्य सरकारला घरचा आहेर; म्हणाले...

ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. मराठे आता ओबीसींचे वाटेकरी झाले आहेत.  ओबीसींमधील भावना चुकीची नाही. मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय? सरकार फक्त हट्ट पुरवण्याचे काम करत आहे, असा घरचा आहेत छगन भुजबळ यांनी साकारला दिला आहे.

Sanjay Raut : सध्या भाजपला हरवायची वेळ : संजय राऊत

सध्या राज्य गुंडगिरीवर सुरू आहे. नवीन सरकार आल्यापासून नगरच्या आमदारांची गुंडगिरी वाढली आहे. कुणाचा बॉस कुठे बसला आहे हे एकदा स्पष्ट होऊद्या. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. एकमेकांची जिरवायला भरपूर वेळ आहे. सध्या भाजपला हरवायची वेळ आहे.काँग्रेसने दक्षिण नगरची जागा लढवायला संधी दिली तर आम्ही नक्की लढू, आमच्याकडे खूप उमेदवार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : नितीश कुमार यांचा राजीनामा देण्याचा छंद : संजय राऊत 

महाविकास आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे, अशी टीका संजय राऊत यांनी अहमदनगरमधून केली आहे. 

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, ताजे अपडेट्स, सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.