Nashik News : नाशिकच्या पंचवटी (Panchavati) परिसरातील एका इमारतीत परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक रहिवाशांवर दादागिरी, असभ्य वर्तन आणि त्रास दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या परप्रांतीय व्यक्तीने महिलेसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अंतर्वस्त्रे बाहेर वाळत घालणे यांसारखे आक्षेपार्ह प्रकार सुरू केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या वर्तनाविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेकडेही संबंधिताने धाव घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर स्थानिक रहिवाशांनी मनसेकडे (MNS) धाव घेतली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय नागरिकाला चांगलाच चोप दिला आहे.  (Nashik News) 

इमारतीत 7 फ्लॅट्स, अनधिकृत ऑफिस 

या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख त्रिपाठी नावाच्या परप्रांतीय व्यक्ती म्हणून झाली असून, त्याच्या मालकीचे एकाच इमारतीत सात फ्लॅट आहेत. विशेष म्हणजे, याच निवासी इमारतीत त्याने 'अलोक सिक्युरिटी सर्व्हिसेस' या नावाने व्यावसायिक कार्यालय सुरू केलं आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, त्रिपाठीने इमारतीतील अन्य फ्लॅटधारकांना त्रास देऊन त्यांचे फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण इमारतीत भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप

या त्रासाला कंटाळून हतबल झालेल्या स्थानिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मनसेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परप्रांतीय व्यक्तीने त्यांच्याशी अरेरावी आणि अश्लील भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.

यानंतर त्रिपाठीने सिक्युरिटी एजन्सीचे बाऊन्सर्स बोलावून नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस तातडीने दाखल झाले आणि त्यांनी बाऊन्सरसह संबंधित परप्रांतीयाला ताब्यात घेतलं. स्थानिक नागरिकांची माफी मागितल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

अनधिकृत ऑफिसवर प्रश्नचिन्ह

सध्या ‘अलोक सिक्युरिटी सर्व्हिसेस’चे कार्यालय बंद असून, एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये व्यावसायिक कार्यालय परवानगीशिवाय सुरू कसे केले गेले? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परप्रांतीयांच्या दादागिरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Accident News: पुण्यात कहरच झाला, मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी, केशवनगरमधील घटना

Kolhapur Crime News: आई घरात नसताना तरूणीनं गळ्याला लावला दोर; त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल, बसमधून जाता-येता...