पुणे: पुणे शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मद्यपान करून गाडी चालवण्याच्या आणि अपघाताच्या (Pune Accident News) मोठ्या घटना समोर येत आहेत, अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच ठोकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशवनगरमध्ये काल (शुक्रवारी, ता 15) राञी दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीच्या या अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दोन आरोपींना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंढवा पोलिसात मद्यधुंद चालकांविरोधात  ड्रँक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Accident News) 

Continues below advertisement


 मुलगी किरकोळ जखमी


पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच धडक दिल्याची घटना समोर आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केशवनगरमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या घटनेत डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं. ते दारू प्यायले होते अशी माहिती समोर आली आहे.(Pune Accident News)