Nashik Crime : चौकशी सुरु असतानाच पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरुन तळमजल्यावर उडी घेत एका 28 वर्षीय आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न (Suicide) केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) शुक्रवारी (16 जून) सकाळी ही घटना घडली आहे. आरोपीवर बलात्कार आणि पॉक्सोसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न का?


जितेंद्र तोरोले असं संबंधित आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. जितेंद्र तोरोलेने १२ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. ही बाब समजल्यानंतर आई-वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी जितेंद्र तोरोलेने शारीरिक संबंध प्रस्थापिक केल्याने ती गर्भवती राहिल्याचा आरोप आईने केला. मुलीच्या आईने या प्रकरणी सिन्नर पोलिसात जितेंद्र तोरोलेविरोधात सिन्नर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार सिन्नर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला पोलीस ठाण्यात आणलं. त्याला पोलीस ठाण्यातील पहिल्या मजल्यावरील अधिकारी कक्षात हजर केले. 


आरोपीवर बलात्कारासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा


दरम्यान चौकशी सुरु असतानाच पाणी पिण्याच्या बहाण्याने जितेंद्र बाहेर आला आणि त्याने कारवाईच्या भीतीपोटी खाली उडी घेतली. पहिल्या मजल्यावरुन उडी घेतल्याने तो गंभीर जखमी झाली. हे बघताच गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रला सिन्नर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या आता बलात्कार आणि पॉक्सोसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्येच आत्महत्येचा प्रयत्न


मागील आठवड्यात नाशिकच्या अंबडमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. संशयित आरोपीने पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. स्थानिक लॉकअप गार्ड वेळीच पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला आहे. संबंधित संशयिताला पोलिसाने आत्महत्येपासून परावृत्त केलं. संशयिताने बाथरुममधील फरशीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  विशाल कुऱ्हाडे असं या आरोपीचं नाव आहे. घरकुल योजनेत एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. विशाल कुऱ्हाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.


हेही वाचा


Nashik Crime : लॉकअपमधील संशयित स्वतःला संपवत होता, मात्र ड्युटीवरचा पोलीस बनला देवदूत, असे वाचविले प्राण