Nashik : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) पुन्हा हाणामारीची घटना घडली आहे. अपघात विभागातच (Accident Department) दोन गट आमने-सामने आल्यानं तुफान हाणामारी झाली आहे. उपचारासाठी आलेल्या जखमी आणि नातेवाईकांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात दोन हा वाद झाल्याची माहिती आहे. मुंबई नाका पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याची काम सुरु आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे जिल्हा रुग्णालय विविध घटनेने चर्चेत आहे. नाशिकचे जिल्हा रुग्णालय आज पुन्हा एकदा हाणामारीच्या घटनेने चर्चेत आले आहे. दोन गटांच्या वादानंतर जखमींवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
कालच जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात शॉर्ट सर्किटमुळं लागली होती आग
नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची घटना घडली आहे. छोट्या बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. कक्षात 66 नवजात बालक होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यात येत आहे. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आलं.सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व परिचरिकांनी लगेच बालकांना सुरक्षित दुसऱ्या कक्षात हलवले होते. शॉर्ट सर्किटनं आग लागल्यानं मातांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. 66 नवाजत शिशूंना शेजारच्या वॉर्डमध्ये नेण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट कशामुळं घडलं याचं कारण समोर आलं नाही.नाशिक जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या कक्षात ठेवत त्या बाळांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात लागलेल्या आगीमुळं अनेकांची धावपळ झाली. अतिदक्षता कक्षातून नवाजत बालकांना आणि त्यांच्या मातांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. मात्र, शॉर्ट सर्किट कोणत्या कारणानं झालं हे समोर आलं नाही. नाशिकचे अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. प्रमोद गुंजाळ यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटनं लागली होती. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व नवजात बालकं सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Hospital Fire : मोठी बातमी, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग, सतर्कतेनं 66 बाळं सुखरुप