Nashik Crime : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगपंचमीच्या (Rangpanchami 2025) दिवशी दोघा भावांची हत्या घडली होती. या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तपासासाठी सहायक आयुक्त मिटकेंची नेमणूक करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. 19 मार्च रोजी रंगपंचमीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीतील बोधलेनगर येथील आंबेडकरवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव (Umesh Jadhav) (32) आणि त्याचा भाऊ प्रशांत भगवान जाधव (Prashant Jadhav) (30) या दोघा भावांची याच परिसरात असणाऱ्या संशयित आरोपी सागर मधुकर गरड (31, रा. आंबेडकरवाडी, उपनगर, नाशिक), अनिल विष्णू रेडेकर (40, रा. उत्तरानगर पोतदार शाळेजवळ, तपोवनरोड नाशिक), सचिन विष्णू रेडेकर (44, रा. गायत्रीनगर, पूना रोड नाशिक), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे (२६, रा. सर्वेश्वर चौक, नवीन सिडको उत्तमनगर, नाशिक), योगेश चंद्रकांत रोकडे (30, रा. आंबेडकरवाडी, उपनगर नाशिक यांनी पूर्व वैमनस्यातून आणि परिसरात आपले वर्चस्व रहावे म्हणू लोखंडी रॉडचा वापर करून निघृण हत्या केली होती.

तपासासंदर्भात उशीर होत असल्याने नागरिक संतप्त

या घटनेने घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही आरोपींना अटक व इतर तपासा संदर्भामध्ये उशीर होत असल्याच्या कारणाने काही सामाजिक कार्यकर्ते तसेच या परिसरातील नागरिक हे संतप्त झालेले होते. त्यांनी या सर्व प्रकरणावरती येत्या सात मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला होता. यातील मृत्यू जाधव बंपू हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित होते. त्यातील एक भाऊ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर उपाध्यक्ष होता. 

पोलीस आयुक्तांकडून एसआयटीची स्थापना

आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी म्हणून एसआयटी म्हणजेच विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. समितीच्या प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांची नियुक्ती केली असून, त्यांना लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune News: वहिनी ब्लिडिंग आणि वेदनेने विव्हळली, मंगेशकर रुग्णालयात निर्दयीपणा चव्हाट्यावर, कुटुंबीयांनी हादरवणारा घटनाक्रम सांगितला

Mumbai Crime News: नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडला! ट्रेनने कुर्ल्यात उतरला, अन् घात झाला, 9 वर्षाच्या मुलावर अत्याचार करून तोंड जमिनीत दाबलं, अंगावर मारहाणीच्या खूणा