Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अद्याप तिढा कायम आहे. नाशिकची जागा शिवसेनेकडेच (Shiv Sena) राहणार की भाजप (BJP), राष्ट्रवादीकडे (NCP) जाणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) देखील नाशिकसाठी ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आल्याने ठाकरे गटात (Shiv Sena UBT) देखील नाराजी पसरली आहे. 


एकंदरीतच मिसळ हब म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या प्रत्येक मिसळ हॉटेलमध्ये देखील याच विषयावर सर्व राजकीय गप्पा रंगलेल्या बघायला मिळत आहेत. दरम्यान सध्याच्या या राजकीय घडामोडींबाबत मिसळप्रेमींना काय वाटतंय याबाबत एबीपी माझाने त्यांच्याशी संवाद साधला आहे.  


हॉटेलमध्ये सुरु आहेत राजकीय गप्पा


एक मिसळ हॉटेलचे मालक म्हणाले की, राजकीय गप्पा रंगल्या आहेत. अनेक जिल्ह्यातून ग्राहक येतात आणि विचारतात तुमच्या नाशिकचा उमेदवार ठरला का? नाशिकला असा खासदार हवा की जो भलं करेल. मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकमागे आहे. पर्यटन असेल किंवा इतर विकास देखील नाशिकमध्ये गरजेचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


गोडसे, भुजबळ दोघांनीही चांगले काम केले


जातीय सलोखा बिघडतोय का असे वाटते? नाशिकला मात्तबर नेता हवा जो संसदेत आवाज उठवू शकेल. नाशिकच्या जागेबाबत लवकरच घोषणा व्हायला हवी. हेमंत गोडसे (Hemant Godse), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) दोघांनीही चांगले काम केले असल्याचे एका ग्राहकाने म्हटले आहे. तर आम्हाला विकास करणारा खासदार हवा. जात आणि इतर गोष्टींपेक्षा विकासावर चर्चा व्हायला पाहिजे, असे दुसऱ्या ग्राहकाने म्हटले आहे. 


नाशिकला उमेदवार का मिळत नाही? कळत नाही


तर एका गृहिणीने म्हटले आहे की, आता सगळं डोक्याच्या वर चाललंय, कोणाचीच उमेदवारी फिक्स होत नाहीये. सगळे मसाले एकत्र झाले, सगळे खडे मसाले झाले, एक मसाला तयार होत नाहीये. नाशिकला उमेदवार का मिळत नाही? कळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर आम्ही मिसळ एन्जॉय करतोय. राजकारण विकासावर व्हायला हवे, अशादेखील प्रतिक्रिया काही मिसळप्रेमींनी दिल्या आहेत.   


इतर महत्वाच्या बातम्या 


मुख्यमंत्र्यांची भेट का घेणार? शिंदे गटाच्या नाशिक जिल्हाप्रमुखांनी सांगितलं नेमकं कारण!


Nashik Loksabha : बोरस्तेंपाठोपाठ हेमंत गोडसेही मुंबईकडे रवाना, नाशिकच्या उमेदवारीबाबत केलं महत्वाचं वक्तव्य