नाशिक : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरातील अंबड लिंकरोडवर पुन्हा एकदा अपघाताची (Accident News) घटना घडली असून आज एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दोन दिवसांत दोन अपघाती मृत्यू झाल्याने स्थानिकांसह वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकचा सातपूर अंबड-लिंक रोड खड्डे आणि अपघातांच्या (Accident) घटनेमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी सकाळी खड्डा चुकवण्याच्या नादात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असतांनाच सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी याच रस्त्यावर पुन्हा अपघात घडला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन पूनम नितीन चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघाताची संपूर्ण घटना CCTV कॅमेरात (CCTV) कैद झाली आहे. पूनम आपल्या नातेवाईकासोबत पल्सर या दुचाकीवरून जात असतांनाच पाठीमागून आलेल्या ट्रकचा मोटरसायकला कट लागला आणि मोटारसायकल रस्त्यावरून घसरली. त्यात पूनम मागच्या चाकाखाली डोकं येऊन त्या गंभीर रित्या जखमी झाल्या. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात येताच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर (Chatrpati Sambhajinagar) येथील पुनम चव्हाण या अपंग वडिलांच्या देखभालीसाठी काही दिवसांपूर्वीच शहरात आली होती. चुंचाळे शिवारातील म्हाडा वसाहतीत अपंग वडिल राहतात. त्यांच्या देखभालीसाठी पुनम चव्हाण आली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ती शेजारी राहणाऱ्या नातेवाईकासोबत या दुचाकीवर सातपूर येथे जात असतांना हा अपघात झाला. सातपूर अंबड लिंकवरून (Satpur Ambad Link) दोघे डबलसीट प्रवास करीत असतांना काळे भांडे डेपोच्या समोरील बाजूने एक्स्लो सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीस हुलकावणी दिली. त्यामुळे दुचाकी पडून दुचाकीस्वार डाव्या बाजूला, तर मागे बसलेल्या पूनम चव्हाण (Poona Chavhan) उजव्या बाजूला पडल्या. त्यात हायवाचे चाक पूनम यांच्या उजव्या पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नातेवाइकांनी तत्काळ एस्क्लो सर्कल येथील खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखले केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
दुर्दैवी मृत्यूने हळहळ
पूनम चव्हाण या मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्यांच्या भावाचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या आईचाही दीड वर्षापूर्वी मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या घराजवळील रामकृष्णनगर येथील राम मंदिराच्या बाजूला पूनम यांचे दिव्यांग वडील रमेश परदेशी राहतात. त्यांची देखभाल करण्यासाठी पूनम काही महिन्यांपासून त्यांच्याकडे वास्तव्यास होत्या. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने स्थानिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिस शिपाई अनिल कु-हाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात ट्रक चालक कांतीलाल नागनाथ वेताळ याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
इतर महत्वाची बातमी :