नाशिक : सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले असून जिल्ह्या जिल्ह्यात शक्तिप्रदर्शनासोबत बॅनरबाजी करण्यात येत आहे. याच दौऱ्यांच्या निमित्ताने अनेक नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आता संभाजीराजे छत्रपती यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 


स्वराज्य संघटनेचा (Swaraj Sanghatana) उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये (Nashik) उद्घाटन झाले. या प्रसंगी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) बोलत होते. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो, एका चांगल्या जागी उद्घाटन झाले. या कार्यालयाचे माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाईल, अपेक्षेपेक्षा जास्त चांगले कार्यालय झाले आहे, नाशिक माझा आवडता जिल्हा असून येथील जनता नेहमीच स्वराज्य पक्षाच्या पाठीशी असल्याने आम्ही देखील जनतेच्या कामांसाठी नेहमीच तत्पर आहे." 


तसेच नाशिक (Nashik) शहरात स्वराज्य पक्षाचे भव्य कार्यालय सुरु करण्यात आले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती नाशिकला आले होते, त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. यात अनेक बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री म्हणून संभाजीराजे छत्रपती यांचा उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यावरुन संभाजीराजे म्हणाले की, "बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे मी आभारी आहे. बॅनरवर लिहिणे आणि होणे ही गोष्ट वेगळी आहे. माझ्या डोळ्यासमोर एकच अजेंडा असून स्वराजच्या माध्यमातून जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचणे. आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर कोणीच खुश नाही, राज्य सत्तेसाठी काही काही गोष्टी सुरु आहे."


मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी 


तसेच मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरु असून मागील काही दिवसांत हे उपोषण चांगलेच चर्चेत आले आहे. या उपोषणस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. सरकारच्या दोन तीन शिष्टमंडळांनी भेटी देऊनही अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. संभाजीराजे छत्रपती हे देखील उपोषणस्थळी जाऊन आलेले आहेत. यावर ते नाशिकमध्ये म्हणाले की, "मी माझी भूमिका सविस्तर मांडली आहे. भावना आणि न्यायिक या दोन्हींचे समेट कसे करता येईल हे महत्वाचे आहे. मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी, त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत चर्चा करावी. माझ्या दृष्टीकोनातून प्रश्न सोडवत असताना जीव देखील महत्वाचा आहे." 


सरकारने टिकणारे आरक्षण द्यावे 


आरक्षणासाठी आतापर्यंत मराठा समाजातील 49 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील सरकारकडून प्रश्न सुटलेला नाही. मनोज जरांगे यांनी त्यांची तब्येत सांभाळून आणि सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत चर्चा करावी. भावना आणि न्यायिक मुद्दा या दोन्ही गोष्टींचा समेट कसा करता येईल हे महत्त्वाचे असून सरकारने देखील टिकणारे आरक्षण द्यावे, असे मत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले. 


इतर महत्वाची बातमी : 


Sambhajiraje Chhatrapati : ...अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही मराठ्यांची फसवणूक ठरेल; संभाजीराजे छत्रपती