नाशिक : नाशिक शहरातून  (Nashik) आज सकाळी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर भव्य गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Visarjan) काढण्यात येणार आहे. यासाठी आज नाशिक शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या क्रमानुसार मिरवणुका काढण्यात येणार आहे. आज सकाळी अकरा वाजता मिरवणुकीला सुरवात होणार असून महापालिका गणेश पहिल्या क्रमांकावर असणार आहे. 


नाशिक शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Visarjan 2023) सकाळी 11 वाजता सुरू झाली आहे.  पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते पूजा करून वाकडी बारवपासून मिरवणूक सुरू होईल. मानाच्या पाच गणपतीसह 21 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 67 सीसीटीव्ही, 4 ड्रोन आणि शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे. गुलालावडी व्यायाम शाळेचे लेझीम पथक, इतर मंडळाचे ढोल पथक मिरवणुकीच्या आनंदात भर घालणार आहे. शिवसेवा युवक मंडळाची मिरवणूक खास आकर्षण रहाणार, दक्षिण भारतातील कलाकार देवांची वेशभूषा धारण करून आपली अदाकारी साकारणार आहेत. सकाळी 9 वाजेपासून घरगुती गणेश विसर्जनाला सुरवात होणार आहे. शहराच्या सहा ही विभागात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


यंदाच्या गणेश विसर्जन (Nashik Ganesh Visarjan) मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या 21 मंडळाच्या क्रम मागील वर्षाप्रमाणेच निश्चित करण्यात आला आहे. यामुळे आज क्रमवारीवरून कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा आक्षेप पोलीस सहन करणार नाहीत, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे जे मंडळ उशिराने मिरवणूक प्रारंभ स्थळ येईल त्या मंडळाला क्रमाबाबत दावा करण्याचा अधिकार राहणार नाही ते सर्वात शेवटी मिरवणुकीत मार्गक्रमण करेल असे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मिरवणूक मार्गावरून मार्गस्थ होताना गणेश मंडळांनी केवळ प्रमुख चौकांमध्येच 15 ते 20 मिनिटे थांबायचे आहेत त्यापेक्षा जास्त मंडळ थांबून राहिल्यास वेळ मर्यादेचे उल्लंघन समजून नोंद पोलिसांकडून केली जाईल असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


असा आहे मिरवणूक क्रम 


यंदाही मागील वर्षे प्रमाणेच नाशिकमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांचा क्रम असणार आहे. यात महानगरपालिका मंडळ क्रमांक  एकवर असणार आहे आणि त्यानंतर अनुक्रमे रविवार कारंजा, गुलालवाडी मित्र मंडळ, भद्रकाली मंडळ, श्रीमान सत्यवादी मंडळ, नाशिकचा राजा, सरदार चौक मंडळ, रोकडोबा मंडळ, शिव सेवा मंडळ, शिवमुद्रा मंडळ मानाचा राजा, युवक मित्र मंडळ, दंडे हनुमान मित्र मंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनेश्वर युवक समिती, नेहरू चौक मंडळ, वेलकम सहकार्य मंडळ, श्री गणेश मुकधीरा मंडळ, युवक संघ प्रतिष्ठान, गजानन मंडळ, महालक्ष्मी फाउंडेशन, उत्कर्ष मित्र मंडळ अशा एकूण 21 मंडळांची मुख्य मिरवणूक असणार आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Ganpati Visarjan 2023 Live : नाशिकमध्ये विसर्जनाची धूम, सकाळी 11 वाजता सुरू होणार होणार मिरवणूक