पुणे : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी काढण्यात (Pune Ganeshotsav 2023) येणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर पोलीस सज्ज झाले आहेत. शहर पोलिसांकडून यंदा 28 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक नियमांचे (Pune Ganeshotsav) पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. यात मिरवणुकीत भाग घेणार्या ढोल ताशा (Dhol Tasha Pathak) पथकांच्या संख्येवर आणि विसर्जन तलावांच्या मार्गावर मंडळ थांंबण्याच्या वेळेवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मिरवणुकीत प्रत्येक गणेश मंडळासोबत फक्त तीन ढोल ताशा पथकांना सादर करण्याची परवानगी असेल. यामध्ये 50 ढोल आणि 15 ताशा वादकांचा समावेश (Ganesh Mandal) असावा आणि त्यांना मिरवणूक मार्गावरील विशिष्ट ठिकाणीच थांबण्याची परवानगी असेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ढोल ताशा पथकांना त्यांच्या मंडळांसह बेलबाग-सेवासदन-टिळक चौक मार्गावरील तीन ठिकाणी थांबण्याची परवानगी दिली जाईल आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी 10 मिनिटे दिली जातील. गणेश मंडळे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरवणूक मार्गावर 205 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर अधिकाऱ्यांसह 9,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून गणेश मंडळांकडून मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारे एकूण 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील कुठले रस्ते राहणार बंद जाणून घेऊया...
शिवाजी रोड
काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधेचौक
(सकाळी 7 ते मिरवणूक संपेपर्यंत)
लक्ष्मी रोड
संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक
(सकाळी 7 ते मिरवणूक संपेपर्यंत)
बाजीराव रोड
बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
(दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)
कुमठेकर रोड
टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
(दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)
गणेश रोड
दारूवाला पुल ते जिजामाता चौक केळकर रोड
(सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत)
केळकर रोड
बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
(सकाळी 10ते मिरवणूक संपेपर्यंत)
टिळक रोड
जेधे चौक ते टिळक चौक
(सकाळी 9 ते मिरवणूक संपेपर्यंत)
जंगली महाराज रोड
झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
(सायंकाळी 4 ते मिरवणूक संपेपर्यंत)
फर्ग्युसन रोड
खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट
(सायंकाळी 4ते मिरवणूक संपेपर्यंत)
इतर महत्वाची बातमी-