नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) सध्या व्हायरल झाली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यात छगन भुजबळ म्हणतात की, "ओबीसींना आता एक मुखाने उभं राहावं लागणार आहे, अन्यथा ओबीसी आता वाचणार नाही", अशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली आहे. 


मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सध्या राज्य सरकार ऍक्टिव्ह मोडवर असून, राज्यभरात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे हे देखील राज्य सरकारला वेळोवेळी याबाबत सूचना करत असल्याचे चित्र आहे. अशातच ओबीसी (OBC) नेते मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral audio Clip) झाल्याचे समोर येत आहे. यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, "मी ओबीसीच्या घरावर म्हणालो नाही, तर सगळ्या ठिकाणी जे आक्रमण सुरू झालेला आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यानिमित्ताने आमदाराचे घर पेटवले जात आहे, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल पेटवले जात आहे. या संदर्भात आपण सध्या कुठेतरी बोललं पाहिजे,"असं म्हणालो असल्याचे ते म्हणाले. 


छगन भुजबळ म्हणाले की, मी ओबीसीच्या घरावर म्हणलो नाही, सगळ्या ठिकाणी जे आक्रमण सुरू झालेला आहे, त्यावर बोललो आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यानिमित्ताने आमदाराचे घर पेटवले जात आहे, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल पेटवल्या जात आहे. या संदर्भात आपण सध्या कुठेतरी बोललं पाहिजे, एक आवाजामध्ये बोललो पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. जसे दुसरे समाज आवाहन करू शकतात, तसं मी ओबीसी समाजातील 375 जातींना आवाहन करू शकतो की, आपण आपलं दुःख मांडलं पाहिजे आणि ते एक मुखाने मांडलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ सध्या बीड दौऱ्यावर असून छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे (Beed) आमदार रमेश सोळुंके आणि क्षीरसागर यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.


काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये? 


सध्या हि ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून यात एक कार्यकर्ता आणि छगन भूजबळ यांचा संवाद ऐकू येत आहे. यात सुरवातीला भुजबळ म्हणतात की, 'सगळी मंडळी आली असून, आता आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोय की आवाज उठवा, मी कुठपर्यंत लढणार, गावागावात त्यांचे बुलडोजर चालले आहेत. यात ओबीसी काही वाचणार नाही आता, करेंगे या मरेंगे अशी स्थिती झाली आहे, असं भुजबळ म्हणताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला असलेला कार्यकर्ता म्हणतोय की, आम्ही तुमच्यासोबत आहोत, यावर भुजबळ म्हणतात की सगळ्यांनी हेच करायला पाहिजे. काय आहे असंही मरतंय तसंही मरतंय. यानंतर कार्यकर्ता म्हणतोय की, आता त्यांनी केलंच आहे, त्यामुळे ओबीसीमध्ये आणलंच आहे. यावर भुजबळ समोरून म्हणतात की, सगळं झालं आहे. अशी एकूणच ऑडिओ क्लिप मधील संवाद ऐकू येत आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Maratha Reservation : मराठा आरक्षण : न्या. शिंदे समितीच्या कार्यक्षेत्र वाढीला विरोध, सदावर्ते कोर्टात याचिका दाखल करणार