नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या (BJP) माध्यमातून हिंदू जनआक्रोश मोर्चाचे (Jan Akrosh Morcha) आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी देखील नाशिक जिल्ह्यासह बहुतांश ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता पुन्हा चांदवडमध्ये भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी चांदवड (Chandwad) परिसरातील हजारो बांधवानी या मोर्चात सहभागी होत जय श्रीरामची घोषणाबाजी केली. यावेळी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. 


काही दिवसांपूर्वी मालेगाव (Malegaon), सटाणा, राहुरी (rahuri) शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज नाशिकच्या चांदवड शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं असून गोरक्षकांवर होणारे हल्ले, धर्मांतर तसेच हिंदू समाजावर होणारा अन्याय हे मुद्दे पुढे करत सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. एकीकडे राज्यात जालना येथील घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे, तसेच अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आहे. अशातच भाजपच्या माध्यमातून लव्ह जिहाद वाढत्या घटनांना यावर घालण्यासाठी चांदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती (Chandwad Bajar Samiti) आवारात मोर्चा काढण्यात आला. 


दरम्यान, लव जिहाद (Love Jihad)आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हिंदू धर्म रक्षण विराट सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शहरातील मुख्य ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे नितेश राणे यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा जात कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विसावला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे नेते आणि पदाधिकारी तसेच असंख्य हिंदू समाज बांधव, महिला भगिनींनी या मोर्चाट्स सहभाग घेतला. यावेळी मोर्चातून जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सभाही घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी सभेला संबोधित केले. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबत तैनात करण्यात आला आहे. 


येवल्यात बंदची हाक 


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून ठिकठिकाणी बंद मोर्चे निघत आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज अंदरसुल यांच्यावतीने नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुमारे एक तास रोखून चक्काजाम करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अंदरसुल गाव आज बंद ठेवण्यात आले. यात छोटे-मोठे दुकाने ही सर्व कडकडीत बंद होती. रस्ता रोको आंदोलन प्रसंगी संबंधितांवर कारवाई व्हावी आणि मराठा समाजाला न्याय मिळावा ही मागणी करण्यात आली. तसेच, आरक्षण लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या विनंतीला मान देऊन रास्ता रोको आंदोलन निवेदन देऊन मागे घेण्यात आले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Malegaon Akrosh Morcha : मालेगाव शहरात आज 'हिंदू जनआक्रोश मोर्चा', मुस्लीम समाजाकडून 'शांती आणि बंधुता पदयात्रा'