नाशिक : 'कोणताही समाजातील घुसखोरी करत असेल तर आदिवासी समाज (Trible Community) बिलकुल खपवून घेणार नाही. आम्ही आजही रस्त्यावर आलो, उद्याही रस्त्यावर येऊ, परत जेव्हा अन्य समाज आदिवासी समाजाचा आरक्षणाचा विरोधात किंवा त्या आरक्षणामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत असेल तर तेव्हाही रस्त्यावर उतरू' असा इशारा आदिवासी संघटनांकडून देण्यात आला.  


गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून राज्यभरात समाज संघटनांकडून आंदोलन केले जात आहे. अशातच आदिवासी समाज देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असून सरकारविरोधात आदिवासी संघटनांनी एकप्रकारे एल्गार पुकारल्याचे या आंदोलनांवरून दिसून येत आहे. आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरी आदी तालुक्यात आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे नांदगाव (Nandgaon) तालुक्यातही आदिवासी संघटनांकडून विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आदिवासी जमातीत धनगर जातीची घुसखोरी करु नये, आदिवासी समाजाच्या धनगर समाजाला लागु केलेल्या सवलती बंद कराव्या, नांदगाव तालुक्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आज नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावरील हुतात्मा स्मारक येथे रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले. 


यावेळी आदिवासी आदिम सेनेतील जयश्री डोळे म्हणाल्या की, आदिवासी समाजामध्ये एकूण 7 टक्के आरक्षण असून 47 जाती इतर आदिवासी समाजामध्ये मोडतात. आजही आदिवासी वाड्या वस्त्यांवर सोयीसुविधा नाहीत, आजही मजुरी करून अआदिवासी समाज उदरनिर्वाह करत आहे. तर दुसरीकडे आता धनगर समाजाची इच्छा आहे की त्यांना आरक्षण मिळावं, परंतु सात टक्के आरक्षणात सरकारने त्यांना आरक्षण दिलं, तर आदिवासी समूहातील इतर 47 च्या जातीनी काय करायचं असा सवाल डोळे यांनी केला. त्याचबरोबर पेसाच्या भारतीप्रक्रियेत अनेक बोगस आदिवासी यांनी नोकऱ्या बळकावल्या असून सरकारने याकडे लक्ष घालावे, असा सर्व प्रकरणामुळे आदिवासी समाज मागे राहिलेला आहे. ज्यांना त्या नोकऱ्यांची गरज होती, त्यांचे हक्क होते, त्यांना ते मिळालेच नाही आणि आता आदिवासी आरक्षणात धनगर समाजाला आरक्षण हवे आहे, हे चुकीचे, त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, पण आदिवासी आरक्षणातून देता कामा नये, असा इशारा डोळे यांनी दिला आहे. 


संघटनांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा 


दरम्यान आज त्र्यंबकेश्वर, घोटी परिसरात आदिवासी संघटनाच्या वतीने जोरदार आंदोलन (protest) करण्यात आले. 'कोणताही समाजातील घुसखोरी करत असेल तर आदिवासी समाज बिलकुल खपवून घेणार नाही. आम्ही आजही रस्त्यावर आलो, उद्याही रस्त्यावर येऊ, परत जेव्हा अन्य समाज आदिवासी समाजाचा आरक्षणाचा विरोधात किंवा त्या आरक्षणामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत असेल तर तेव्हाही रस्त्यावर उतरू' असा इशारा आदिवासी संघटनांकडून देण्यात आला आहे. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आदिवासी जातीत धनगर जमातीने घुसखोरी करू नये, अन्यथा आदिवासींवर होणार अन्याय - अत्याचार टाळण्यासाठी यापेक्षाही तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या आंदोलनप्रसंगी विविध आदिवासी संघटनांनी दिला. आंदोलनात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव एकवटले होते.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : आरक्षणप्रश्नी आदिवासी समाज आक्रमक, नाशिकच्या त्र्यंबकेश्वरसह घोटी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन