नाशिक : यंदा अनंत चतुर्दशी (Ganeshotsav) आणि ईद-ए-मिलाद (Eid 2023) हे दोन सण एकाच दिवशी आल्याने तसेच दोन्ही मिरवणुकांचा मार्ग एकच असल्याने नाशिक पोलिसांनी(Nashik Police) तोडगा काढला आहे. ईद-ए-मिलाची मिरवणूक नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशी होणार आहे. गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणूक होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ईद ए मिलादचा सण साजरा केला जाणार आहे.
राज्यभरात गणेशोत्सवाचे (Anant Chaturdashi) आनंददायी वातावरण असून काल लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची (Nashik) बैठक पार पडली. यात गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते. या बैठकीत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात 'ईद-ए-मिलाद'चा सण गुरुवारऐवजी शुक्रवारी साजरा केला जाणार आहे, अशी घोषणा शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी बैठकीत केली. विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर 28 तारखेला होईल व ईदचा 'जुलूस' 29 तारखेला पारंपरिक मिरवणूक मार्गावरून काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी जुलुसचीं मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरम्यान चंद्रदर्शन घडत नाही, तोपर्यंत ईद- ए-मिलाद साजरी करण्याबाबतचा निर्णय शहर-ए-खतीब व शहरातील सर्व धर्मगुरूसह सुन्नी मरकजी सिरत समितीने राखून ठेवला होता. त्यामुळे पुढील शुक्रवारी चंद्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने शुक्रवारी 29 सप्टेंबरला ईद ए मिलाद नाशिक शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान अनंत चतुर्दशीनंतर 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधी जिल्ह्यात ईद-ए-मिलाच्या मिरवणुका निघणार आहे. त्यामध्ये 29 सप्टेंबरला नाशिक शहरासह जिल्ह्यात तर 30 सप्टेंबरला येवला शहर तर एक ऑक्टोबर रोजी सिन्नरमध्ये इथे मिलादची मिरवणूक निघणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी ईद ए मिलादचा जुलूस
यावेळी आमदार देवयानी फरांदे या बैठकीत म्हणाल्या की, जातीय सलोखा, सामाजिक बंधुभाव हा नाशिकचा इतिहास राहिला आहे. दोन्ही धर्मीय लोक या शहरात आनंदाने गुण्यागोविंदाने राहत एकमेकांसोबत सण-उत्सव साजरे करत आले आहेत, यामुळे दोन्ही सण शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरे होतील. याबाबत काळजी करण्यासारखे कारण नाही, असेही फरांदे यावेळी म्हणाल्या. नाशिक शहरात 29 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वाकडी बारावी येथून मुख्य जुलूसला प्रारंभ करण्यात येईल. तसेच वडाळागाव, नाशिकरोड या भागांमध्ये सुद्धा याच तारखेला सकाळी पारंपरिक मार्गावरून जुलुस काढण्यात येणार आहे, हे तिनही जुलूस डीजे मुक्त राहतील, असे मुस्लिम संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातम्या