नाशिक : यंदाच्या गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनेतला आनंदाचा शिधा मिळण्यास सुरवात झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा वाटप करण्यात सुरवात झाली आहे. यंदाच्या आनंदाच्या शिधा पिशवीवर अजित पवार यांचा फोटो असून पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे, मात्र किटमध्ये पूर्वीप्रमाणेच चणाडाळ, राव, साखर, तेल देण्यात आले आहे. 


गरिबांचाही सण उत्सव गोड जावा, या दृष्टीने राज्य सरकारकडून दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) जयंती पाठोपाठ गणेशोत्सवातही अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा (Aanandacha Shidha) दिला जातो आहे. आनंदाचा शिधा किटमध्ये चनाडाळ, रवा, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल देण्यात येते आहे. अजित पवारांचा (Ajit Pawar) गट सरकारमध्ये आल्याने आणि अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) अन्न, नागरी पुरवठा खाते मिळाल्याने यंदाच्या शिधा किट पिशवीवर गणपती बाप्पासोबतच अजित पवारांचा फोटो आणि छगन भुजबळांचे नाव झळकले असून पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे. 


मागील वर्षभरापासून राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा नागरिकांना दिला जात आहे. आता गणेशोत्सवानिमित्त शिधा' शिधापत्रिकाधारकांना इ-पॉस प्रणालीद्वारे केवळ 100 रुपयांत वितरीत केला जात आहे. मात्र, गणेशोत्सवाला (Ganesh Chaturthi) चारच दिवस शिल्लक असून लवकरात लवकर आनंदाचा शिधा घरोघरी पोहचावा यासाठी प्रशासन प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वाटप सुरु करण्यात आले असून शहरात मात्र हळूहळू पुरवठा होण्यास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 80 टक्के आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. वितरणही सुरू करण्यात आले आहे. तर नाशिक शहरात एका ठिकाणी साठवून मग त्या त्या रेशन दुकानात पाठवला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकपर्यंत पोहोचण्यास थोडा उशीर होत आहे. मात्र येत्या दोन दिवसांत प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत शिधा पोहोचण्यात येईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली आहे.


सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना लाभ


नाशिक जिल्ह्यातील तब्बल सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. आनंदाच्या शिध्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल आदी साहित्याचा समावेश आहे. शहरातील काही रेशन दुकानांत रवा तर कुठे केवळ चणाडाळ व साखर तर कुठे रवा आणि साखर अशा वस्तूच प्राप्त झाल्याने आनंदाच्या शिध्याचे पॅकेटच पूर्ण होत नसल्याची तक्रार रेशन दुकानदारांकडून करण्यात येत आहे. अधिक शहरातील 230 तर जिल्ह्यातील 599 रास्त भाव दुकानांतून या शिध्याच्या संचाचे वाटप होत आहे. छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यातच 7 लाख 78 हजार दोनशे तिन लाभार्थी आहेत. 14 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 80 टक्के किट दाखल झाले आहे. यात पिशव्या मात्र फक्त 2 लाख 63 हजार 886 पोहोचल्या असून 5 लाख 14 हजार 317 पिशव्यांच्या प्रशासन प्रतीक्षेत आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik : नाशिक जिल्ह्यातील सात लाख लाभार्थ्यांना गौरी गणपतीत मिळणार आनंदाचा शिधा, 100 रुपयांत काय-काय मिळणार?