नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (maratha Arakshan मुद्दा चांगलंच पेटला असून राज्यभरात कुठे आंदोलन (Protest), कुठे बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक मराठा बांधव आंदोलनात सहभाग घेत आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस असून आजपासून त्यांनी पाण्यासह सलाईन देखील सोडलं आहे. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे. एका शेतकऱ्याने स्वतःला सरणावर बसवत आंदोलन सुरु केले आहे.
जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 14 वा दिवस आहे. तर, कालपासून मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केले आहे. दरम्यान मराठा आरक्षण मागणीसाठी केलेल्या आमरण उपोषणाला समर्थन म्हणून निफाड (Niphad) तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी वाल्मिक गंगाराम बोरगुडे यांनी रविवारी सकाळी 8 वाजेपासून नैताळे गावी सरणावर बसत आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. जोपर्यत मनोज जरांगे उपोषण सोडत नाहीत, तोपर्यंत मी देखील उपोषण सुरु ठेवणार असल्याचा निर्णय या शेतकऱ्याने घेतला आहे.
मराठा आरक्षणाचा (Maratha Resrevation) मुद्दा चांगलाच गाजत असून जालना येथील लाठीचार्जनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर येथील आंतरवली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला हादरवून सोडले आहे. अनेक शिष्टमंडळाच्या बैठकींनंतरही तोडगा निघू शकलेला नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अनेक मराठा बांधवांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्याने जरांगे यांच्या आंदोलनाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे. वाल्मिक गंगाराम बोरगुडे या शेतकऱ्याने कालपासून सरणावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी निफाड पोलीस ठाण्यास (Niphad Police Station) देखील दिले आहे.
तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून उपोषण सुरू करण्यात आले. यानंतर चार वाजेच्या सुमारास गावातील मराठा तरुणांनी घरोघरी जात सरण रचनासाठी एक लाकूड व एक गोवरी गोळा केली. अन उपोषण सुरु केले आहे. गावातील भजनी मंडळी, टाळ मृदुंगाच्या गजरात उपोषण स्थळी भजन म्हणत होते. बोरगुडेंच्या या उपोषणामुळे प्रशासकीय अधिकायांची धावपळ उडाली. आमदार दिलीप बनकर यांनीही बोरगुडे यांची भेट घेतली. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे, नेताळेचे तलाठी शंकर खडांगळे यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, जोपर्यंत जरांगे यांचे उपोषण सुरू राहील तोपर्यंत आपलेही उपोषण चालूच राहील, अशी भूमिका बोरगुडे यांनी घेतली आहे.
इतर महत्वाची बातमी :