नाशिक : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याकरता दिलेली मुदत संपूनही राज्य सरकारने ठोस निर्णय घेतल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले असून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांच्या प्रवेशद्वारावर पुढार्यांच्या प्रवेश बंदीचे फलक लागले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी 29 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले होते. एक महिन्यात सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन राज्य सरकारने दिले. निर्णय घेण्यासाठी सरकारला 40 दिवसांची म्हणजे 24 ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देऊन जरांगे यांनी 14 सप्टेंबरला उपोषण सोडले. आज मंगळवार विजयादशमीच्या दिवशी ही मुदत संपत असून सरकारने अद्याप समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी तीव्र परंतु शांततेच्या मार्गाने सरकारला न जपणाऱ्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नाशिक (Nashik) मधून देखील बळ देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना जिल्ह्यातील गावागावात ' प्रवेश बंदी ' करण्यात येत आहे.
आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील गावांमध्ये येण्यास पुढाऱ्यांना बंदी करावी असे आवाहन जवान जरंगे यांनी केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नांदगाव, निफाड (Niphad), नाशिक, इगतपुरी (Igatpuri), सिन्नर (Sinner) या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लासलगावसह जिल्ह्यातील अनेक गावांच्या स्वागत कमानीजवळ सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात ' प्रवेश बंदी ' असे डिजिटल फलक लावण्यात आले आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष, मराठा आरक्षण (Maratha Aarkashan) जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही, असा उल्लेख या फलकावर करण्यात आल्याने राजकीय नेत्यांना आता लासलगावसह जिल्ह्यातील गावागावांत प्रवेश बंदी करण्यात आल्याने राजकीय नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
जिल्ह्यातील या गावांमध्ये गावबंदी
त्यानुसार नाशिक तालुक्यातील शिंदे, पळसे, गिरणारे, महिरावणी, मातोरी, मुंगसरे, देवगाव तर निफाड तालुक्यातील शिंगवे, चांदोरी, सायखेडा, चाटोरी, नैताळे, टाकळी, सारोळे, गोळेगाव, लासलगाव, रानवड, गाजरवाडी, खडक माळेगाव, निमगाव, साताळी, मरळगोई, गोळेगाव, रामपूर दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी, जोपुळ, वणी, लोखंडेवाडी, वरखेडा तर नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी, जळगाव खुर्द, मूळ डोंगरी, हिंगणे देहरे, मांडवड आणि त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील आधारवड, टाकेद आणि सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत.
इतर महत्वाची बातमी :