नाशिक : नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वादग्रस्त शिक्षण अधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना 50 हजारांची लाचप्रकरणी (Bribe) एसीबीने रंगेहाथ महापालिकेतच अटक केली होती. या कारवाईनंतर शिक्षण विभागातील भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना घराच्या झाडाझडतीमध्ये तब्बल 96 लाख 43 हजारांची बेहिशेबी रक्कम मिळून आली. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. 


नाशिक (Nashik) महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुनीता धनगर यांना जूनमध्ये 50 हजारांची लाच घेतांना एसीबीने अटक केली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान जवळपास कोट्यवधींची संपत्ती असल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले. त्यावेळी प्रकरण चांगलेच गाजले होते. थेट पावसाळी अधिवेशनात देखील यावर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvais) यांनी धनगर यांच्या विरोधात ईडीमार्फत चौकशी करण्यात येऊन अपसंपदेचा गुन्हा येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यांनतर त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. आता चौकशीनंतर एसीबीकडून त्यांच्या अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एसीबीचे निरीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 50 हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यांच्या घरझडतीमध्ये पथकाने 96 लाख 43 हजारांची बेहिशेबी रक्कम आणि कोट्यवधींची मालमत्ता असलेली कागदपत्रे जप्त केली होती. धनगर यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. यात 16 जून 2010 ते 3 जून 2023 या सेवेच्या कालावधीत लोकसेवक असतांना त्यांच्या कायदेशीर मालमत्तेच्या स्त्रोतापेक्षा अधिक रक्कम आणि स्थावर मालमत्ता जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानुसार त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर विभागाच्या लाचखोरांची भूमीअभिलेख, आदिवासी या विभागाच्या एसीबीकडून चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याबाबात प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


सुनीता धनगर लाच प्रकरण?


जून 2023 मध्ये हे प्रकरण समोर आलं होत. यात सेवेत रुजू करून घेण्यास नकार देणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेवर कारवाई करण्याच्या मोबदल्यात बडतर्फ मुख्याध्यापकाकडून 50 हजारांची लाच घेतांना सुनीता धनगर याना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एका लिपिकानेही तक्रारदाराला पत्र बनवून देण्यासाठी 5 हजारांची लाच घेतली होती. यानंतर हे प्रकरण चांगलचं चर्चेत आलं होत. यानंतर एसीबीकडून चौकशी सुरु असताना तब्बल 85 लाख रोख रक्कम आणि 32 तोळे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले होते. तसेच त्यांच्या नावावर दोन आलिशान फ्लॅट आणि एक जागा तपासात समोर ली होती. त्या सध्या वास्तव्यास असलेल्या राहत्या फ्लॅटचीच किंमत जवळपास दीड कोटी रुपये एवढी आहे. आणि आता चौकशीत कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक 96 लाख 43 हजार 809 रुपये इतकी अपसंपदा जमा केल्याचे दिसून आले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Sunita Dhangar : लाचखोर धनगर मॅडमवर तर कारवाई, पण ज्याने तक्रार केली त्याची होतेय अडवणूक; दोन महिन्यानंतरही कामासाठी मारावे लागतात खेटे