नाशिक : दिवाळी (Diwali) अवघ्या काही दिवसांवर आल्याने नाशिककरांकडून (Nashik) दिवाळी खरेदीही लगबग सुरु आहे. दिवाळीत फराळाला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या (Fodd And Drugs) वतीने नाशिकच्या वेगवगेळ्या भागात अन्नपदार्थामध्ये भेसळ केल्याप्रकरणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड यासह इतर अन्नपदार्थांचा लाखोंचा साठा जप्त करण्यात आला आहे.


दिवाळी (Diwali 2023) म्हटली की मिठाई आणि फराळाला प्रचंड मागणी असते. मात्र याचाच फायदा घेऊन काही मिठाई विक्रेते भेसळ (Adulteration) करत असल्याचे यापूर्वी देखील समोर आले आहे. ही बाब लक्षात घेउन अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मधुर फुड प्लाझा (Madhur Food Plaza) मिठाई शॉपवर छापा टाकून कारवाई केली आहे. पथकाने तपासणी केली असता विक्रीसाठी प्लॉस्टिक डब्यांमध्ये साठविलेल्या श्रीखंड या अन्नपदार्थांच्या पॅकिंगवर बॅच नंबर, उत्पादन केल्याची तारीख तसेच एक्सापयरी डेट व कुठे व कुणी उत्पादन केले, त्याबाबतचा संपुर्ण पत्ता कुठेच आढळून आला नाही. भेसळीच्या संशयावरून 18 हजार 450 रूपयांच्या 61.5 किलो श्रीखंडावर जप्तीची कारवाई करण्यात आली.  


तसेच दुसरी कारवाई सिन्नर (Sinner) शहराजवळील माळेगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या इगल कॉर्पोरेशनवर धाड टाकली. या ठिकाणी अस्ताव्यस्त असलेले खाद्यतेल आणि पुर्नवापर केलेल्या डब्यांमध्ये खादयतेलाची विक्री तसेच भेसळीच्या संशयावरुन कारवाई करण्यात आली. यात खुल्या स्वरूपात 53 प्लॉस्टिक कॅनमध्ये 93 हजार 335 रुपये किमतीचे रिफाईण्ड सोयाबीन तेल, रिफाइण्ड सोयाबीन तेलाचे पुर्नवापर केलेले 613.4 किलोचे 41 डबे याची किंमत 62 हजार 566 रुपये, तर रिफाईण्ड पामोलिन तेल पुर्नवापर केलेले 418.4 किलोचे 37 हजार 556 रुपये किमतीचे 28 डबे असा एकुण 1 लाख 93 हजार 558 इतका साठा जप्त करण्यात आला. 


मिठाई विक्रेत्यांना महत्वाचे आवाहन        


                                                                                                                                                                               
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, स्विटमार्टधारक व किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहित व मुदतपूर्व दिनांक नमूद असलेलेच दुग्धजन्य पदार्थ विक्री करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दुधात होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दुध भेसळीबाबात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वेगवेगळया 61 ठिकाणी दुध व दुग्धजन्‍य पदार्थांचे नमूने तपासणीची कार्यवाही करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात गुजरात राज्यातून येणाऱ्या खवा/मावा व इतर दुग्धजन्य पदार्थ तपासणी करून जिल्हास्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Diwali 2023 : सावधान! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट मिठाईचा धोका! असली-नकली कसं ओळखाल?