नाशिक : संपूर्ण राज्यात पावसाने (Rain) ओढ दिल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातही दुष्काळ सदृश्य परिस्थिती (Maharashtra Drought) निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास एकूण 92 पैकी 55 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस नाही, यामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला असून खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 


पावसाळ्याच्या हंगामातील ऑगस्ट (August 2023) महिना संपून आता सप्टेंबरची सुरवात झाली तरी पुरेसा पाऊस (Mahrashtra Rain) न झाल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यावरही भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर उद्भवला आहेच. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी जोर धरू लागलेली असतानाच पाऊस लांबल्याचा शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी 40 टक्के पाऊस कमी झाला आहे. एकूण 92 पैकी 55 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस नाही, त्यामुळे पिकांची दयनीय अवस्था झाली असून पिके (Crop  Damage) करपू लागली आहेत. आता कुठे पिकांनी माना धरायला सुरूवात केली होती, मात्र पाऊस नसल्याने पिके कोमेजून गेल्याचे चित्र आहे. 


एकीकडे ऑगस्ट महिना हा तर पिकांच्या वाढीसाठी महत्वाचा असतो. जिल्ह्यात 6 लाख 39 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती, मात्र पाऊस नसल्याचा परिणाम म्हणून मका, सोयाबीन, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मका 70 ते 80 टक्के तर सोयाबीन, बाजरी आणि कापसामागे 60-65 टक्क्यांनी घट झाली आहे. पावसाने अजूनही ओढ दिल्यास कांदा आणि ईतर पिकेही संकटात सापडतील, अशी शक्यता आहे. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपन्यांसाठी अधिसूचना जारी केली असून पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या 5 लाख 86 हजार शेतकऱ्यांना शासन निर्णयानूसार 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याची सूचना करण्यात आली आहे, उत्पादनातील घटाच्या 25 टक्के ही रक्कम दिली जाईल, असे सांगितले जात आहे. 


राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती 


राज्यात दुष्काळासारखी परीस्थिती असून दुबार पेरणीचे संकट उभे राहिला आहे. दुबार पेरणी केली तरी पीक वाचलं का नाही, याची शक्यता नाही. त्यामुळे सरकारने याबाबत काळजीपूर्वक पावलं उचलली पाहिजेत, अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या देखील उभी राहिली आहे. यावर वेळीच काही खबरदारी घेतली नाही तर काही दिवसांनी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक भागात पाऊस नसल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून काही दिवसांपुरता चारा शिल्लक असल्याचा शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आणखीन काही दिवस पाऊस न आल्यास शेतकऱ्यांकडे मोठं संकट चाऱ्याचं उभ राहण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Rains : पावसाची प्रतीक्षाच! नाशिक जिल्ह्यात 68 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा, वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई