Nashik Diwali Bhaubeej : भाऊबीजेला गालबोट लागले असून माहेराला गेलेल्या दोघा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे.
यंदा मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा होत आहे. आज भाऊबीज म्हणजे बहीण भावाचा दिवस. भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी महिला वर्गाची लगबग सुरू आहे. अशातच नाशिकहून कोपरगाव या ठिकाणी भाऊबीजेला गेलेल्या विवाहितेसह भाचिचा कपडे धुवत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी येथे ही घटना घडली आहे. भाऊबीजी निमित्त भावाकडे आलेल्या बहिणीचा व दुसऱ्या बहिणीच्या मुलीचा गोदावरी नदीवर धुणे धुत असतांना मुलाचा पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अर्चना जगदीश सोनवणे रा. वणी नाशिक व कु. राणी शरद शिंदे रा. म्हसरूळ नाशिक असे मयत झालेल्या महिलांचे नावे आहे.
दरम्यान भाऊबीज निमित्त कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे मंगेश माणिकराव चव्हाण या भावाकडे 3 बहिणी तसेच भाचा-भाच्या आल्या होत्या. त्या आज सकाळी भाऊबीज आटोपून घरानजीक असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेल्या. अर्चना सोनवणे यांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने काठावरून पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात गेली.
दरम्यान त्यापाठोपाठ त्यांच्या तीन भाच्यांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली असे एकूण पाच जण नदीत बुडत असतांना अवघ्या चौदा वर्षीय मामाचा मुलगा मंगेश याने तीन जणांना वाचविले. मात्र आत्या व दुसऱ्या आत्याच्या मुलीला तो वाचवू शकला नसल्याची माहिती उपस्थित नातेवाईकांनी दिली आहे. सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
गोदाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीवर काळाचा घाला
दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीवर काळाने घाला घातला आहे. गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून मावशी आणि भाचीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अर्चना जगदीश सोनवणे (वय ३५ राहणार नाशिक) आणि गौरी शरद शिंदे (वय १८ रा. मसरुळ नाशिक) असे मृत्यु झालेल्या मावशी व भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.