Nashik Earthquake नाशिक :  नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र नाशिक शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर असल्याचं समोर आलं आहे. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे.  ग्रामीण भागात केंद्रबिंदू असणाऱ्या या भूकंपाचे हादरे नाशिक शहरात ही जाणवले आहेत. नाशिक जिल्ह्याती सुरगाणा, दिंडोरी, सप्तश्रृंगी गड, पेठ या ग्रामीण भाग सोबतच नाशिक शहारत अनेक भागात धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.  पेठ, दिंडोरी, कळवण, चांदवड, देवळा, नाशिक या तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 

Continues below advertisement

नाशिकच्या ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के सुरुच

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासह  नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये भूकंपांचे धक्के जाणवले आहे, यामुळं नाशिककरांमध्ये  घबराट दिसून आली आहे.  गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नाशिक जिल्ह्यात व तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

नाशिक जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना

 नागरिकांनी भूंकपाचे धक्के जाणवत असताना घरात असल्यास खिडक्या, काचा, कपाटे व जड वस्तूंपासून दूर राहावे. शक्य असल्यास मजबूत टेबलाखाली आसरा घ्यावा. भूकंपाचे धक्के सुरू असताना लिफ्टचा वापर करू नये व धावत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये.धक्के थांबल्यानंतर इमारतीपासून सुरक्षित अंतरावर मोकळ्या जागेत जावे. विजेच्या तारा, झाडे व धोकादायक बांधकामांपासून दूर राहावे. अफवा किंवा अप्रमाणित माहिती पसरवू नये. प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असं आवाहन नाशिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची काळजी घ्यावी. नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांनी शांतता राखून एकमेकांना सहकार्य करावे, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.