Nashik Accident: नाशिकमध्ये सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे झाड अंगावर पडून एका तरुणाचा मूत्यू झाल्याची दुर्घटना घडली असून दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय.  जनजीवन विस्कळीत झाले असून पावसात सातपूर परिसरात हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Unseasonal Rain)

नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. गौरव रिपोटे (वय 21) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत असणारा समनयक भोसले (वय 21) गंभीर जखमी आहे. दोघेही त्यांच्या कामासाठी दुचाकीवरून कंपनीत जात होते. त्याच दरम्यान सातपूरजवळ अचानक आलेल्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक झाड कोसळले. हे झाड थेट त्यांच्या दुचाकीवर पडल्यामुळे दोघेही त्याखाली अडकल्याने गंभीर जखमी झाले. यात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दोघांना उपचारासाठी नेले असता त्यात एकाला मृत घोषित करत  दुसऱ्यावर उपचार सुरू आहे. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे विविध ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली आहे.

नाशिकला अवकाळी पावसाने झोपडपलं..

नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली अर्धा ते पाऊण तासाच्या पावसामुळे नाशिकच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि झाडे पडण्याच्या घटना घडली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला  मोठा अडथळा निर्माण होता. गेल्या पाच दिवसांपासून नाशिकला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपल्याच पाहायला मिळत आहे. नाशिक शहरामध्ये धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर असताना अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झाड कोसळल्याच्या घटना घडत आहे. आज देखील अवकाळी पाऊस झाल्यामुळे नाशिकच्या एन डी पटेलरोड येथे भले मोठे गुलमोहरचे झाड कोसळले आहेत.

हे झाड विद्युत तारांवर कोसळल्याने परिसरातील तीन विद्युत खांब देखील उन्मळून पडले आहेत तर , घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.घटनास्थळी अग्निशमन विभागाचे दोन पथक तर महावितरणाच एक पथक दाखल झाले आहेत. रस्त्यात झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Nashik Unseasonal Rain : उन्हाळा आहे की पावसाळा? नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळीचा धुमाकूळ, पाहा PHOTOS