Nashik Unseasonal Rain : उन्हाळा आहे की पावसाळा? नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळीचा धुमाकूळ, पाहा PHOTOS

Nashik Unseasonal Rain : नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Continues below advertisement

Nashik Unseasonal Rain

Continues below advertisement
1/10
नाशिककरांना सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले.
2/10
सोमवारी (दि. 12) दुपारच्या सुमारास नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
3/10
या पावसामुळे नाशिक शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्याचा रूप आलं होतं.
4/10
अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाले होते.
5/10
पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
Continues below advertisement
6/10
नाशिकमध्ये 15 ते 20 मिनिट पावसाने रौद्ररूप धारण केल्याने नाशिकमधील रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे चित्र आहे.
7/10
नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार, सीबीएस, सिडको, नाशिकरोड, सातपूर यासह विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.
8/10
दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे.
9/10
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. 600 गावातील 14 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
10/10
रविवारी सायंकाळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील काही भागांना भेट देऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
Sponsored Links by Taboola