Nashik ACB Raid : आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला (Dinesh Kumar Bagul) न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बँक लॉकर्स आणि जमिनीच्या काही कागदपत्रांच्या संदर्भातील तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) दिनेशकुमार बागुलला कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. अखेर कोर्टाने ही  मागणी मान्य केली आहे.


आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा आणि महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने 28 लाख 80 हजारांची लाच घेतली होती.  त्याला गुरुवारी (25 ऑगस्ट) दुपारी नाशिकमधील तिडके कॉलनी परिसरातील राहत्या घरी लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. सेंट्रल किचनच्या वर्क ऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडून त्याने 28 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. बागुल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या नाशिक,पुणे, धुळे आदी घरांवर धाडसत्र टाकत कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या लाचखोर अभियंत्यास 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. बागुल याच्याकडे आणखी करोडो रुपयांचे घबाड सापडण्याची शक्यता एसीबीने (ACB) व्यक्त केली होती. त्यासाठी अधिक चौकशी करण्यासाठी रिमांड मागितला होता. त्यामुळं न्यायालयाने बागुलला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे.


दरम्यान, आतापर्यंत बागुलच्या नाशिक आणि पुण्याच्या घरी 1 कोटी 44 लाख 3 हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम, काही दागिने आणि महत्वाची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली आहेत. तसेच काल देखील दिवसभर एसीबीच्या कार्यालयात त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याचे खाते असलेल्या बँकेसोबत देखील पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच लॉकर्स देखील उघडले जाणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच आदिवासी विकासच्या  बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले होते. गेल्या काही  दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: