Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) निमित्ताने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस आयुक्त (CP Jayant Naiknaware) जयंत नाईकनवरे यांनी शहरात शनिवार (दि.27) मध्यरात्रीपासून ते 09 सप्टेंबरपर्यंत पुढील पंधरा दिवसांसाठी मनाई आदेश लागू केला आहे. नाशिक शहरात पुढील पंधरा दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला असून नाशिक पोलिसांकडून याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.


आगामी काळातील सण उत्सव सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पोलीस आयुक्तांनी शहरात शांतता राहण्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत त्यानुसार शहरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सभा घेणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन आंदोलन करणे, निदर्शने बंद पुकारणे, उपोषणे करत असतात. तसेच भाविक हे धार्मिक सण उत्सवासाठी कार्यक्रमाचे आयोजन करतात अशा परिस्थितीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.


दरम्यान 31 ऑगस्ट पासून ते 9 सप्टेंबर पर्यंत गणेश स्थापना व त्यानंतर विसर्जन मिरवणुका संपन्न होणार आहे. बिलकिस बानू प्रकरणाच्या मुस्लिम समाजाकडून उमटणाऱ्या प्रतिक्रिया अग्निपथ सैन्य भरतीविरोधाच्या अनुषंगाने आंदोलने व निदर्शने चालू आहेत. राजकीय पक्षात सत्ता स्थापनेवरून पक्षात फूट पडल्याचे कारणावरून एकमेकांविषयी होत असलेले आरोप व प्रत्यारोप आणि मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संभाव्य निवडणूक प्रक्रिया या सर्व कार्यक्रम व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय मध्ये 27 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत पंधरा दिवसांकरता मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.


नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून १० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केला आहे. त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाहीत. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बागळता येणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी आहे. पूर्वपरवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. 


असा असेल मनाई आदेश
नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून 10 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केला आहे. त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाहीत. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बागळता येणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजविण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी आहे. पूर्वपरवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे.