नाशिक : रामकुंडावर (Ramkund) वाहत्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या नाशिकरोड (Nashikroad) येथील शाळेतील विद्यार्थ्याला (Student) पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्याचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू (Drown) झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे. आराध्य मोहन कराडकर (14) असे मुलाचे नाव आहे.


आराध्य हा शनिवारी सकाळी स्कॉलरशिप (Scholarship) क्लासला जाण्यासाठी घरातून सायकलवर बाहेर पडला होता. पुढे अमोल बिन व अक्षय शिंदे या मित्रांसोबत तो रामकुंडाजवळ आंघोळीला आला. दुपारी एक वाजेच्या सुमारास अमोल, अक्षय व आराध्य यांनी पाण्यात उड्या मारल्या. 


वाहत्या पाण्यात उडी मारली अन्...


पाण्याचा प्रवाह जास्त असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते तत्काळ नदीच्या काठावर आले. मात्र, आराध्यने वाहत्या पाण्यात उडी मारली. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तो बुडून पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहत गेला. या घटनेची माहिती गंगाघाटावरील नागरिकांनी पंचवटी पोलीस व अग्निशमन दलाला कळविल्यानंतर पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी गंगाघाटावर असलेल्या जीवरक्षक दलाच्या जवानांची मदत घेऊन बुडालेल्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी गाडगे महाराज पुलाजवळील नदीपात्रात आराध्यचा मृतदेह अग्निशमन दल व जीव रक्षक दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढला. आराध्य हा नाशिकरोड जेलरोडवरील वृत्तपत्र विक्रेता मोहन मधुकर कराडकर यांचा एकुलता एक मुलगा होता. तो पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


29 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू


दरम्यान, काही दिवसांपूर्वी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यावेळी रामकुंड येथे आलेला यग्नेश पवार (29, रा.ओझर) हा पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.  तो नीलकंठेश्वर मंदिर येथे कालसर्प पूजेनिमित्त आला होता. गोदावरी नदीत (Godavari River) पूजन करताना पाय घसरून नदीत पडल्याने तो वाहून गेला. यावेळी त्याची आई देखील त्याठिकाणी उपस्थित होती. यावेळी डोळ्यादेखतच आपला तरणाबांड मुलगा वाहून गेल्याने तिने एकच टाहो फोडला होता. तर तीन वर्षाची मुलगीदेखील पाण्यात पडली होती. मात्र, तिला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या


जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 


Bhandardara Dam : भंडारदरा धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू