नाशिक : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी मान्य करत सरकराने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह विविध मराठा संघटना आनंदोत्सव साजरा करत आहे. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. सरकारने मनोज जरांगे यांची दिशाभूल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना मनोज आखरे म्हणाले की,"मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन काढलेला अध्यादेश हा संपूर्ण प्रकारे चुकीचा आहे. मुळात 57 लाख नोंदी सापडल्याचं नाही. शासनाने मनोज जरांगे यांची दिशाभूल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत बोललेलं सर्व धादांत खोटं आहे. मराठा आणि कुणबी हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होतोय. सगेसोयरे याचे स्पष्टीकरण द्यावे, शासनाने तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांची दिशाभूल
पुढे बोलतांना मनोज आखरे म्हणाले की, “हेतू पुरस्कर मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा ही मागणी अद्याप अपूर्णच आहे. आरक्षणाचा लभ देतांना पितृसत्ताक सोबत मातृसत्ताक विवाह ग्राह्य धरावे. मनोज जरांगे यांची दिशाभूल होत असल्याचं त्यांना कळाल नसेल. तर, भुजबळांना जर सामाजिक जाण असती तर त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलं नसतं. देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा म्हणून भुजबळ काम करत आहेत. भुजबळांनी दोन जातीत तेढ निर्माण करून भांडण लावण्याचं काम केलं, असल्याचे देखील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले आहेत.
अध्यादेशाची उद्यापासूनच अमलबजावणी करा
सरकराने उद्यापासूनच नवीन अध्यादेशाची अमलबजावणी सुरु करावी अशी विनंती जरांगे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, त्याच नोदींच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकराने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. मात्र, या नवीन अध्यादेशानुसार जोपर्यंत किमान पहिला प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आंतरवाली सराटीत सुरूच राहणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याच्या शब्दावर आपण ठाम असल्याचे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : अध्यादेशाची उद्यापासूनच अमलबजावणी करा; मनोज जरांगेंची सरकारकडे विनंती