जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या लढ्याला मोठं यश मिळाले असून, जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच, जरांगे यांच्या मागणीनुसार सगेसोयरे बाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. दरम्यान, आता या अध्यादेशाची उद्यापासूनच अमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. आज आंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) ते बोलत होते. 

Continues below advertisement

दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,“ मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, त्याच नोदींच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकराने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. मात्र, या नवीन अध्यादेशानुसार जोपर्यंत किमान पहिला प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) सुरूच राहणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याच्या शब्दावर आपण ठाम असल्याचे जरांगे म्हणाले. तर, सरकराने उद्यापासूनच या नवीन अध्यादेशाची अमलबजावणी सुरु करावी अशी विनंती" जरांगे यांनी केली आहे. 

दोनदा दिवाळी साजरी करणार...

सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाच्या कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्यावतीने आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहोत. पहिला गुलाल कायदा झाल्याचा आणि दुसरा गुलाल कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर उधळणार आहोत. त्यामुळे काल एक दिवाळी झाली असून, कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर दुसरी महादिवाळी साजरी केली जाणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

Continues below advertisement

छगन भुजबळांवर टीका...

दरम्यान याचवेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर देखील टीका केली. 'भुजबळ यांना कळाले आहे की, आता मराठे आरक्षणात गेले आहेत. त्यामुळे काहीतरी बरळायचे म्हणून बरगळत आहे. त्यामुळे गाव खेड्यातील ओबीसी आणि मराठा बांधवांना माझी विनंती आहे, आपण एकत्र राहिले पाहिजे. राजकीय लोक आपल्यात वाद लावतात. मराठा समाजाच्या नोंदी मिळाल्या आहे, त्यामुळे जे व्हायचं ते होणारच आहे. मराठा समाज शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे आणि तो गेला सुद्धा असल्याचं जरांगे म्हणाले. आमचा कायदा पक्का आहे, भुजबळ तिकडे जेवढं वळवळ करतील तेवढं समजायचं कायदा पक्का असल्याचं समजायचं असेही जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

 आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार 'या' नेत्यांचं; जातीय समीकरणाचे असेही गणित...