Nashik MLC Election : नाशिक (Nashik) पदवीधर च्या निवडणुकीत पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून जवळपास 25 हजार मतांची मतमोजणी या फेरीत पूर्ण झाली आहे. या पंचवीस हजार मतांपैकी 2641 मते अवैध ठरली आहेत. तर या पहिल्या फेरीनुसार सत्यजित तांबे हे 7 हजार 922 मतांनी आघाडीवर आहेत.


नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) गेल्या तासाभरापासून पहिल्या फेरीतली मतमोजणी सुरू झाली आहे. सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील (shubhangi Patl) यांच्यामध्ये या मतदारसंघातल्या लढतीनं  महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. दुपारी अडीचनंतर साधारण पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली. या मतमोजणीमध्ये सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. नाशिक पदवीधर च्या निवडणुकीत पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून जवळपास 25 हजार मतांची मतमोजणी या फेरीत पूर्ण झाली आहे. या पंचवीस हजार मतांपैकी 2641 मते अवैध ठरली आहेत. तर या पहिल्या फेरीनुसार सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत.


दरम्यान पहिल्या फेरीत 25 हजार मतांची मतमोजणी करण्यात आली. त्यानुसार सत्यजित तांबे 15 हजार 784, शुभांगी भास्कर पाटील 7 हजार 862, रचन कचरू बनसोडे 560, सुरेश भीमराव पवार 225, अनिल शांताराम तेजा 28, अन्सारी राईस अहमद अब्दुल कादिल 51, अविनाश महादू माळी 268, इरफान इखलाख 18, ईश्वर उखा पाटील 45, बाळासाहेब रामनाथ घोरपडे 142, ऍड. जुबेर नासिर शेख 54, ऍड. सुभाष राजाराम जंगले 46, नितीन नारायण सरोदे 63, पोपट सिताराम बनकर 24, सुभाष निवृत्ती शिंदे 46, संजय एकनाथ माळी 42 मते पडली आहेत.


सुरुवातीच्या काळामध्ये शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे या दोघांमध्ये हा सामना चुरस पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत पहिल्या फेरीचा निकाल हाती आलं असून त्यानुसार जवळपास ७ हजार ९२२ मतांनी शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या दीड तासांपासून जवळपास जवळपास मतमोजणी सुरू आहे. अशा स्वरूपाची कांटे की टक्कर या दोघांमध्ये सुरू होती. मात्र आता पहिल्या फेरीची मतमोजणी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून हळूहळू सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतल्याचं बघायला मिळते. त्यामुळे पहिल्या फेरीच्या अंतिम चित्र बघायचं झालं तर सत्यजित तांबे हे सध्या आघाडीवर असून अद्याप अनेक फेऱ्या बाकी असल्याने शुभांगी पाटील किती झपाट्याने पुढे येतात, मतदारांनी त्यांना किती पसंती दिली, हे थोड्याच वेळात समोर येईल. 


निकाल उशिरापर्यंत लागण्याची शक्यता... 


दरम्यान आता सहा वाजेला अपहील्या फेरीचा निकाल हाती आल असून आजून अनेक फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे नाशिक पदवीधरचा निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. एक फेरी म्हणजेच पहिली फेरी पूर्ण होण्यासाठी जवळपास एक ते दीड तासांचा कालावधी हा लागत आहे. त्यामुळे नाशिक पदवीधरचा निकाल हा उशिरापर्यंत लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.