Mumbai-Nashik Local : 'वंदे भारत' एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर आता मुंबई-नाशिक लोकल (Mumbai-Nashik Local) सुरु करण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मनमाड-इगतपुरीदरम्यान नव्याने टाकण्यात येणारी रेल्वे मार्गिका थेट कसारापर्यंत घेऊन जाण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली होती. ही मागणी मान्य करुन इगतपुरी-कसारा या नव्या मार्गिकेसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक लोकल सेवा सुरू होणे शक्य होणार आहे.


 98 मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा वेळ वाचणार


मुंबई ते नाशिक लोकल सेवा सुरु झाली तर त्यामुळं कसारा घाटातून ये-जा करणाऱ्या 98 मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा वेळही वाचणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. यापूर्वी जादा क्षमतेच्या लोकलची कसारा घाटात चाचणी घेण्यात येणार होती. परंतू या लोकल कसारा घाटात चालवणे शक्य नसल्याचा अहवाल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाकडे दिला होता. त्यामुळं हे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र, आता मुंबई ते नाशिक लोकल सेवा सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळं यावर आता रेल्वेमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.


नाशिक ते मुंबई हे अंतर 180 किलोमीटरचे


रेल्वेमार्गे नाशिक ते मुंबई हे अंतर जवळपास 180 किलोमीटरचे आहे. मात्र, कसारा ते इगतपुरीदरम्यान असलेले घाट, डोंगरदऱ्यांमध्ये रेल्वे वहातुकीला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळं कसारा ते इगतपुरी दरम्यान रेल्वेला अतिरीक्त इंजीन लावले जाते. नव तंत्रज्ञानामुळं इगतपुरी ते कसारादरम्यान निर्माण केलेल्या बोगद्यातून रेल्वे वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळं इगतपुरी ते कसारादरम्यान नव्यानं रेल्वे मार्गिकेची जोडणी करुन नाशिक-मुंबई प्रवासाचा वेळ कमी करणं शक्य असल्याचे रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Railway Budget For Mumbai :  रेल्वे अर्थसंकल्पात मोदी सरकारचे 'मिशन मुंबई'; मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी सर्वाधिक निधीची तरतूद