Aditya Thackeray Ayodhya Visit : राज्याचे पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thakaray) यांच्या अयोध्या (Ayodhya Tour) दौर्‍याकडे शिवसैनिकांचे लूक्ष वेधले असून आज नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून साधारपणे दोन हजार शिवसैनिक (Shivsainik) अयोध्येकडे रवाना झाले आहेत. मात्र घाई गडबडीत अनेक शिवसैनिकांची ट्रेन चुकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांचा अयोध्या दौरा होतो कि नाही असा सवाल सध्या उपथित होत आहे. 


पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा बुधवारी अयोध्या दौरा असून हा दौरा यशस्वी करण्यासाठी नाशिकहून असंख्य शिवसैनिक आयोध्येयला रवाना झाला आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्याची जबाबदारी नाशिकच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दौर्‍याच्या तयारीसाठी गेल्या तीन दिवसापासून पदाधिकारी अयोध्येत तळ ठोकून आहेत. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या येथून अयोध्या एक्सप्रेस रवाना झाली. यामध्ये ज्वलप्स नाशिकहून डोह हजाराहून अधिक शिवसैनिक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 


गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचा अयोध्या चर्चित आहे. ते कधी जाणार, कसे जाणार, त्यांच्यासमवेत कोण कोण जाणार, यामध्ये शिवसैनिकांचा किती सहभाग असेल, नाशिक जिल्ह्यातील किती पदाधिकारी जाणार याकडे सार्‍यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान या दौऱ्यासाठी नाशिकहून शिवसैनिक रवाना झाले आहेत. त्यासाठी रेल्वेचे बुकींगही करण्यात आले होते. 


दरम्यान शिवसैनिकांना घेऊन जाण्याची जबाबदारी शिवसेना उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुख यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. त्यानुसार आज रेल्वेमार्गाने तर एकही रस्त्याने शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले आहेत. 


नाशिकच्या शिवसैनिकांवर मदार 
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा शिवसेनेकडून मोठा इव्हेंट केला जात असून त्याची जबाबदारी नाशिकच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आदेशानुसार विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आणि अजय बोरसे यांनी ठाकरे यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार दौऱ्याच्या तयारीसाठी हे तिघे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शनिवारीच अयोध्येला दाखल झाले असून त्यांनी नियोजन सुरू केले आहे. दरम्यान आज सायंकाळी नाशिकहून दोन हजार सैनिकांनी विशेष रेल्वेने अयोध्येला प्रस्थान केले. 


शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले कि, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे हा दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते झोकून देऊन काम करीत आहेत. दौर्‍याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिक योगदान देत असून, नाशिकवर टाकलेला विश्वास दौरा यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. याच पार्श्वभूमीवर आज साधारपणे दोन हजार कार्यकर्ते या दौर्‍यासाठी अयोध्येला रवाना झालं आहेत. 


शिवसैनिकांची चुकामुक 
आज सायंकाळी नाशिकरोड हुन अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आली होती. सायंकाळचा लेव्हल असल्याने सगळ्यांना वेळेवर हजार राहण्याच्या सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र गाडी निघून गेल्यानंतर अनेक शिवसैनिक प्लॅटफॉर्मवर धावताना दिसले. हातात बाग, पाणी बॉटल्स घेऊन ते जात अयोध्येला निघाले होते, मात्र गाडी सुटल्याने त्यांचा अयोध्या दौरा राहिल्याचे दिसून आले.